coronavirus : औरंगाबादेत कोरोना ३ हजार पार, ९६ रुग्णांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 10:33 AM2020-06-17T10:33:27+5:302020-06-17T10:34:11+5:30
आज आढळलेल्या बाधितांमध्ये ३९ महिला व ५७ पुरूष आहेत.
औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी कोरोनाग्रस्तांची संख्या ३ हजार पार गेली. सकाळी ९६ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३०२८ झाली असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.
जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांत राजीवनगर १, समतानगर २, पेंशनपुरा १, भवानीनगर १, रेहमानिया कॉलनी १, मसूननगर १, पळशी २, एन आठ सिडको ५, पुष्प गार्डन १, गजानननगर १, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर १, सेव्हन हिल १, हडको १, एसआरपीएफ कॉलनी २, जटवाडा रोड १, बीडबायपास १, नारेगाव ३, जयभवानीनगर २, ठाकरेनगर १, न्यू एसटी कॉलनी, एन दोन सिडको १, मनजीतनगर १, एन नऊ सिडको ३, जुनी मुकुंदवाडी,विठ्ठल मंदिर जवळ २, शंभूनगर, गारखेडा १, न्यू विशालनगर ५ ब्रिजवाडी १, शहानूरवाडी १, यशोधरा कॉलनी १, गुलमंडी १, पद्मपुरा १, नागेश्वरवाडी २, उस्मानपुरा १, शिवशंकर कॉलनी १, बेरी बाग १, राजनगर १, उत्तमनगर १, जवाहर कॉलनी १, ज्योतीनगर १ समर्थनगर १०, सिडको १, हनुमाननगर १, सातारा परिसर १, रमानगर २, विश्रांतीनगर ३, सिडको वाळूज महानगर दोन २, बजाजनगर, गुलमोहर कॉलनी २, शिवाजीनगर ३, न्यू हनुमाननगर १ गारखेडा २, मयूरनगर १, राहुलनगर १, बजाजनगर १, संभाजी कॉलनी १, संजयनगर १, आयोध्यानगर,सिडको १, मोतीवालानगर १ औरंगपुरा १, अन्य १, विश्वभारती कॉलनी १ , रांजणगाव, शेणपूजी १, चिकलठाणा १ या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये ३९ महिला व ५७ पुरूष आहेत.