coronavirus : औरंगाबादेत कोरोनाबाधित ३२०० पार; आज ९१ रुग्णांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 10:02 AM2020-06-19T10:02:03+5:302020-06-19T10:02:23+5:30
आता १२७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत
औरंगाबाद : जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी ९१ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३२०७ झाली आहे. यापैकी १७६३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर १७१ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता १२७५ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले.
आढळलेल्या रुग्णांत राजन नगर १, बायजीपुरा १, रहीम नगर १, युनुस कॉलनी १, हनुमान चौक चिकलठाणा १, राम नगर १, बजाज नगर २, रशीदपुरा १, नारळीबाग २, क्रांती नगर १, अंबिका नगर १, पुंडलिक नगर ३, नागेश्वरवाडी २, नक्षत्रवाडी १, हर्सुल २, एन नऊ सिडको २, एन अकरा सिडको २, मिल कॉर्नर १,एन पाच सिडको १, एन ८ सिडको १, शिवाजी नगर १, जाधववाडी २, शंभू नगर ४, चिकलठाणा ५, रामकृष्ण नगर २, इटखेडा २, विश्वभारती कॉलनी २, बीड बायपास १, न्यू हनुमान नगर २, जय हिंद नगर, पिसादेवी १, भानुदास नगर १, श्रीविहार कॉलनी, बीड बायपास ३, जाधववाडी १, पळशी १, आरीश कॉलनी १, गौतम नगर, प्रगती कॉलनी १, द्वारका नगर, हडको १, समता नगर १, शिवाजी नगर २, लहू नगर २, राम नगर १, ब्रिजवाडी १, शहानूरवाडी ४, मुजीब कॉलनी ५, रामेश्वर नगर २, न्यू विशाल नगर १, मयूर नगर १, बुढीलेन १, सह्याद्री हाऊसिंग सोसायटी १, सिडको महानगर १, लोकमान्य चौक, बजाज नगर २, सुयोग हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर ४, साऊथ सिटी, सिडको महानगर १, शिवशंभो हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर १, शिवालय चौक, बजाज नगर १, सारा गौरव, बजाज नगर १ या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये ३५ स्त्री व ५६ पुरूष बाधीत आहे.