coronavirus : चार कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू; एकूण मृत्यूचा ३८१
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 08:18 PM2020-07-17T20:18:00+5:302020-07-17T20:19:45+5:30
चारही रुग्णांना कोरोनासोबत सहविकृती होत्या.
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात चार कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चारही रुग्णांना कोरोनासोबत सहविकृती होत्या. आतापर्यत एकूण मृत्यूचा एकदा ३८१ झाला आहे.
छावणी येथील ६१ वर्षीय पुरुष, हनुमान नगर गल्ली नंबर २ येथील ४५ वर्षीय महिला, संसार नगर येथील ६० वर्षीय महिला, आदीत्यनगर गारखेडा येथील ५४ वर्षीय पुरुष रुग्णाचा गुरुवारी मृत्यू झाल्याचे घाटी प्रशासनाने शुक्रवारी कळवले.
शुक्रवारी सकाळी ८८ रुग्णांची भर
जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी ८८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत ९८३२ कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी ५६३६ बरे झाले, ३८१ जणांचा मृत्यू झाला. तर ३८१५ जणांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये शहर प्रवेशवेळी केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये सहा जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
मनपा हद्दीतील रुग्ण
एनआरएच हॉस्टेल १, बेगमपुरा १, गारखेडा १, केळी बाजार १, जटवाडा १, चैतन्य नगर, हर्सुल १, जवाहर नगर पोलिस स्टेशन जवळ १, पद्मपुरा १, बन्सीलाल नगर २, क्रांती नगर ९, राधास्वामी कॉलन, हर्सुल १ एन अकरा १, अयोध्या नगर १, पवन नगर २, शिवाजी नगर १, अविष्कार कॉलनी १, प्रकाश नगर १, ठाकरे नगर १, जय भवानी नगर १, एन चार सिडको २, एन आठ सिडको १, श्रद्धा नगर १, एन दोन राजीव गांधी नगर १, एन तीन सिडको १, एन सहा, सिडको १, चिकलठाणा १, एन सहा संभाजी कॉलनी १, बालाजी नगर २, नक्षत्रवाडी १, अन्य १
ग्रामीण भागातील रुग्ण
रांजणगाव १, फुलंब्री ४,फुलंब्री पोस्ट ऑफिस समोर, फुलंब्री १, टिळक नगर, कन्नड १, बोरगाव अर्ज, फुलंब्री १, पळसवाडी, खुलताबाद १, शेंद्रा कामंगर ४, कुंभेफळ ४, मोठी आळी, खुलताबाद २, चित्तेगाव ७, भवानी नगर, पैठण १, समता नगर, गंगापूर १, शिक्षक कॉलनी, सिल्लोड २, डोंगरगाव, सिल्लोड १, पुरणवाडी, सिल्लोड १, समता नगर, सिल्लोड १, शिवाजी नगर, सिल्लोड १, घाटनांद्रा सिल्लोड १, शंकर कॉलनी, वैजापूर १, कुलकर्णी गल्ली, वैजापूर १, इंदिरा नगर, वैजापूर १, अण्णाभाऊ साठे नगर, वैजापूर १ देवगाव १ या भागातील कोरोनाबाधित आहेत.