CoronaVirus : शेतकऱ्यांचे 'रेशमी'स्वप्न भंगले; लॉकडाऊनमुळे हजारो क्विंटल तयार कोष पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 03:45 PM2020-04-10T15:45:49+5:302020-04-10T15:50:00+5:30
योग्य वेळी कोष विक्री झाली नाही तर कोषातून फुलपाखरू बाहेर पडून किंमत होते नगण्य
पाथरी : कोरोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने सर्वच बाजारपेठ बंद पडल्या आहेत ,याचा फटका सर्वसामान्य सोबतच शेतकऱ्यांना ही मोठ्या प्रमाणावर बसू लागला आहे , तालुक्यातील कासापुरी येथील शेतकऱ्यांने तयार केलेला रेशीम कोष बाजारपेठे अभावी पडून आहे , सहा दिवसात कोष विक्री न झाल्यास त्यातून फुलपाखरू बाहेर पडून कोशाची किंमत नगण्य होत असल्याने त्याचा मोठा फटका बसला आहे शेतकऱ्यांनी तयार झालेला कोष आता नाईलाजाने घराच्या छतावर कोरडा करण्यासाठी वाळू घातला आहे.
महाराष्ट्र राज्याच्या तुलनेत मराठवाडा भागात एकूण रेशीम शेतीच्या 70 टक्के रेशीम शेती व्यवसाय आहे , रेशीम शेतीत चांगले उत्पादन मिळत असल्याने मागील चार पाच वर्षात परभणी जिल्ह्यात रेशीम शेती व्यवसाय वाढला गेला आहे , या वर्षात रेशीम कोषाला कर्नाटक राज्यातील बाजारपेठ मध्ये 50 हजार रुपये क्विंटल पेक्षा अधिक दर मिळत होता.
रेशीम शेती पीक शेतात लागवड केलेल्या तुती च्या पाल्यावर येते , हे पीक खूप अल्पावधीचे असल्याने आणि त्या साठी वेळेनुसार पीक काढणी ते कोष विक्री करावे लागते , मात्र संचारबंदी सुरू असल्याने रेल्वे बंद असल्याने कर्नाटकातील बाजार पेठ बंद झाल्या आहेत तर जालना येथील कोष खरेदी बाजारपेठ बंद आहे , त्या मुळे शेतकऱ्यांनी तयार केलेला कोष विक्री साठी बाजारपेठ नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
छतावर वाळू घालण्याची आली वेळ
कासापुरी येथील शेतकरी गणेश वशिष्ठराव कोल्हे यांनी 200 अंडीजपू घेऊन रेशीमचा क्रॉप घेतला. त्यात 1 क्विंटल 75 किलो कोष निघाला साधारणपणे त्याची बाजार किंमत 80 हजार रुपये ऐवढी आहे. त्यानी तयार केलेला कोष विक्री साठी बाजारपेठ बंद आहे , कोष तयार झाल्यानंतर सहा ते आठ दिवसात कोषातून फुलपाखरू बाहेर पडून कोष खराब होऊन त्याची किंमत नगण्य होत असल्याने बाजारपेठ बंद असल्याने आता तयार कोष घराच्या छतावर वाळू घातला आहे , वाळलेल्या कोषाचे वजन 3 पट कमी होत असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे तसेच याच गावातील नारायण वैजनाथ बादाडे यांनी ही 150 अंडीजपूचा रेशीम कोष तयार केला आहे त्याचा या शेतकऱ्याला ही फटका बसला गेला आहे ,
कोष विक्रीसाठी वाहतूक पास मिळेना
बीड आणि जालना जिल्ह्यात काही व्यापारी कोष खरेदी करून त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या रिलिंग युनिट मध्ये धागा तयार करतात.सध्या च्या अडचणीच्या काळात हे व्यापारी पड्या भावाने कोष खरेदी करत आहेत , तिकडे कोष विक्री साठी न्यायचा म्हटलं तरी वाहनासाठी पासेस मिळत नाहीत असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.