coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यातील चार बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 07:17 PM2020-08-08T19:17:42+5:302020-08-08T19:22:04+5:30
जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १६ हजार २८३ एवढी झाली आहे.
औरंगाबाद : जिल्ह्यातील चार बाधितांचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. यामुळे आतापर्यंत एकूण मृत्यूची संख्या ५३३ झाली आहे.
मृतांमध्ये रांजणगांव-शेणपुंजी येथील ७२ वर्षीय पुरुष, सावखेडा (ता. गंगापुर) येथील ७० वर्षीय महिला, बिल्डा( ता फुलंब्री) येथील ७१ वर्षीय पुरुष, लोणी खुर्द (ता. वैजापुर) येथील ७८ वर्षीय पुरुष या बाधित रुग्णांचा समावेश आहे.
आज १३० बाधितांची वाढ
शनिवारी १३० बाधितांची वाढ झाली. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १६ हजार २८३ एवढी झाली आहे. त्यापैकी ११ हजार ९६० जण बरे झाले तर ५३३ बाधितांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. सध्या ३,७५० जणांवर उपचार सुरु आहेत.
मनपा हद्दीतील ७० रुग्ण
एन सहा सिडको १, मुकुंदवाडी ४, एनआरएच हॉस्टेल, घाटी परिसर १, बीड बायपास, आलोक नगर १, उस्मानपुरा १, सादात नगर १, भिमाशंकर कॉलनी ४, खडकेश्वर १, कासलीवाल मार्बल इमारत परिसर १, शिवाजी नगर, गारखेडा २, मिटमिटा ७, मयूरबन कॉलनी, शहानूरवाडी १, श्रेय नगर १, हिंदुस्तान निवास, नक्षत्रवाडी १, जवाहर कॉलनी १, हनुमान चौक,चिकलठाणा १, सुपारी हनुमान रोड, नगारखाना १, लघुवेतन कॉलनी, सिडको १, आशा नगर, शिवाजी नगर १, जय भवानी नगर २, एन अकरा टीव्ही सेंटर १, हर्सुल टी पॉइंट ३, गणेश नगर १, पद्मपुरा १, बालाजी नगर १०, पानदरीबा १, हर्सुल १, एन दोन, राजीव गांधी नगर १, चिकलठाणा १, गुरूसहानी नगर, एन चार १, पन्नालाल नगर, उस्मानपुरा १, अन्य १, मथुरा नगर, सिडको १, नक्षत्रवाडी १, प्राईड इग्मा फेज एक १, बन्सीलाल नगर २, पैठण रोड १, हायकोर्ट कॉलनी, सातारा परिसर १, एकनाथ नगर १, गुरूदत्त नगर १, बंजारा कॉलनी १, मोंढा परिसर १, महालक्ष्मी चौक परिसर १, एन चार, सिडको १.
ग्रामीण भागातील ६० रुग्ण
चिंचखेड १, लासूर स्टेशन २, राम नगर, पैठण १, जर गल्ली, पैठण १, सिडको, वाळूज १, बजाज नगर ३, वडगाव, बजाज नगर १, ओमकार सो., बजाज नगर २, बीएसएनएल गोडावून जवळ, बजाज नगर १, वाळूज पोलिस स्टेशन परिसर २, भोलीतांडा, खुलताबाद ५, पाचोड, पैठण २, लगड वसती, गंगापूर १, कायगाव, गंगापूर ९, जाधवगल्ली, गंगापूर १, शिवाजी नगर, गंगापूर २, झोलेगाव, गंगापूर १, समता नगर, गंगापूर १, गंगापूर ५, सिल्लोड ३, टिळक नगर, सिल्लोड ३, शिवाजी नगर, सिल्लोड ३, समता नगर, सिल्लोड १, बालाजी नगर,सिल्लोड २, वरद हॉस्पीटल परिसर,सिल्लोड १, शास्त्री कॉलनी, सिल्लोड २, उप आरोग्य केंद्र परिसर, सिल्लोड १, पानवडोद,सिल्लोड १, आंबेडकर नगर, सिल्लोड १.