CoronaVirus: औरंगाबादकरांसाठी शुभ शुक्रवार; ४२ संशयितांचे अहवाल आले निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 08:43 PM2020-04-10T20:43:42+5:302020-04-10T20:45:31+5:30

शहरात मागील तीन दिवस सलग आढळले रुग्ण

CoronaVirus: Good Friday for Aurangabad; 42 suspects were reported negative | CoronaVirus: औरंगाबादकरांसाठी शुभ शुक्रवार; ४२ संशयितांचे अहवाल आले निगेटिव्ह

CoronaVirus: औरंगाबादकरांसाठी शुभ शुक्रवार; ४२ संशयितांचे अहवाल आले निगेटिव्ह

googlenewsNext
ठळक मुद्देशहरात आतापर्यंत आढळले १८ रुग्ण

औरंगाबाद : सलग तीन दिवस कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर औरंगाबादकरांसाठी शुक्रवार शुभ ठरला असून आज एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही. शुक्रवार सायंकाळी 42 संशयितांचे अहवाल निगेटीव्ह आले असुन त्या रुग्णांना सुटी देण्यात आली. 72 संशयीतांच्या लाळेचे नमुन्यांचे अहवाल प्रलंबीत आहे. अशी माहीती डाॅ. सुंदर कुलकर्णी यांनी दिली.


शहरात कोरोनाचे आतापर्यंत १८ रुग्ण आढळुन आले आहेत. यातील एकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, मागील तीन दिवसांपासून शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने शहरवासीयांची चिंता वाढली होती. मात्र शुक्रवार शहरवासीयांना दिलासा देणारा ठरला असून आज तब्बल ४२ संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आले असून एकही पॉझिटिव्ह अहवाल आला नाही. सध्या जिल्हा रुग्णालयात दिवसभरात 75 रुग्णांचे स्क्रिनींग झाले. त्यापैकी 13 जणांना होम क्वाॅरंटाईन करण्यात असुन 57 संशयीतांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले. या 57 जणांना जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. सध्या जिल्हा रुग्णालयात 15 कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

 

Web Title: CoronaVirus: Good Friday for Aurangabad; 42 suspects were reported negative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.