CoronaVirus : आनंदवार्ता ! १४ दिवसांच्या उपचारानंतर बायजीपूरा येथील युवक कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 02:41 PM2020-04-27T14:41:46+5:302020-04-27T14:43:42+5:30
शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २३ वर
औरंगाबाद : बायजीपूरा येथील युवकाचे 14 दिवसांच्या उपचारानंतर दोन्ही तपासणी अहवाल निगेटिव्ह आले. कोरोनामुक्त झाल्याने त्याला सोमवारी जिल्हा रुग्णालयातून सुटी देण्यात आली. अशी माहिती डॉ प्रदीप कुलकर्णी यांनी दिली.
कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर युवकावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. १४ दिवसांच्या उपचारानंतर त्याचा स्वॅब तपासण्यात आला असता तो निगेटिव्ह आला. त्यानंतरच्या २४ तासात त्याचा दुसरा स्वॅब तपासला असता त्याचा अहवाल देखील निगेटिव्ह आला. युवकाचे दोन्ही स्वब निगेटिव्ह आल्याने तोो कोरोना मुक्त झाला असून त्याला रुग्णालयातुन सुटी देण्यात आली. यासह शहरात कोरोनामुक्त संख्या 23 वर पोहचली आहे.
दरम्यान, शहरात कोरोनामुळे आज सहावा बळी गेला.घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना किलेअर्क येथील ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. सदर महिला २४ एप्रिल रोजी घाटीत दाखल झाली होती. २५ एप्रिल रोजी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. उपचार सुरू असताना सोमवारी १२.३० मिनिटांनी त्यांचा मृत्यु झाला,अशी माहिती डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली.