CoronaVirus: आनंदवार्ता! दोन आठवड्यात कोरोनावर मात करणाऱ्या महिलेची रुग्णालयातून सुटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 06:36 PM2020-04-15T18:36:46+5:302020-04-15T20:24:48+5:30
महिलेचे २४ तासातील दोन स्वॅब अहवाल निगेटिव्ह आले
औरंगाबाद : एन- ४ येथील कोरोना पॉझिटिव्ह ५८ वर्षीय महिलेचे दोन्ही स्वॅब निगेटिव्ह आले. त्यामुळे बुधवारी सायंकाळी या महिलेला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. दोन आठवड्यात महिलेने कोरोनावर मात केली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना शहरातील महिलेचे पती दिल्लीहून औरंगाबादेत परतले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याने खाजगी रुग्णालयात उपचार घेतले. कोरोनाच्या लक्षणामुळे तपासणी करण्यात आली होती. मात्र, पतीसह अन्य नातेवाईक कोरोना अहवाल निगेटिव्ह आले. मात्र, ही ५८ वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळून आली.
दोन आठवड्यात केली मात
यानंतर जिल्हा रुग्णालयात ३० मार्चपासून महिलेवर उपचार सुरू होते. उपचाराच्या १४ व्या आणि १५ व्या दिवशी या महिलेचे २४ तासात दोन स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले. या दोनपैकी एक अहवाल सोमवारी निगेटिव्ह आला होता. दुसरा अहवाल काय येतो, याकडे जिल्हा रुग्णालय आणि संपूर्ण आरोग्य यंत्रणेनेचे लक्ष लागले होते. अखेर मंगळवारी रात्री हा दुसरा अहवालही निगेटिव्ह आला आणि जिल्हा रुग्णालय प्रशासनाने सुटकेचा निःश्वास घेतला.