CoronaVirus : भद्रा मारूती मंदीरात पहिल्यांदाच भाविकाविना हनुमान जन्मोत्सव; कोरोनामुक्तीचे घातले साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 10:45 AM2020-04-08T10:45:54+5:302020-04-08T10:51:28+5:30
संस्थानकडून 10 लाखाची मदत
- सुनील घोडके
खुलताबाद : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले खुलताबाद येथील भद्रा मारूती मंदीरात मोजक्यात विश्वस्तांच्या उपस्थीतीत हनुमान जन्मोत्सव सोहळा पार पडला संस्थानचे विश्वस्त माजी खा. चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते महापुजा व आरती करण्यात आली.
घ्या खुलताबाद येथील भद्रा मारुतीचे ऑनलाईन दर्शन
दरवर्षी भद्रा मारूती मंदीरात हनुमान जन्मोत्सव सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थीतीत पार पाडला जातो पंरतू यंदा कोरोनाच्या पार्श्वभुमीवर भद्रा मारूती संस्थानचे अध्यक्ष मिठ्ठू बारगळ ,माजी अध्यक्ष काशीनाथ बारगळ विश्वस्त चंद्रकांत खैरे , जनसंपर्क अधिकारी राजेंद्र जोंधळे यांच्या प्रमुख उपस्थीतीत जन्मोत्सव सोहळा पार पडला.
10 लाखाची मदत
या वेळी माजी खा.चंद्रकांत खैरे यांनी कोरोनासाठी भद्रा मारूती संसंथानने मुख्यमंत्री सहाय्यता निधी व पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी प्रत्येकी पाच लाख रूपये देण्यात आल्याचे सांगितले तसेच आजच्या हनुमान जन्मोत्सव सोहळ्या निमित्त कोरोना आजार लवकर नष्ठ होऊ दे अशी प्रार्थना करण्यात आल्याचे सांगितले. भद्रा मारूती मंदीरात दर्शनासाठी लाखो भाविक गर्दी करत असतात पण आज देशभरात कोरोनाच्या संकटामुळे भाविकांसाठी दर्शन बंद करण्यात आले आहे.
जमावबंदी आदेश लागू असल्याने पोलीस निरिक्षक सीताराम मेहत्रे , तहसीलदार राहुल गायकवाड यांनी गर्दी करणा-यावर गुन्हे दाखल करण्याचे सांगितलेआहे. एकंदरीत मोजक्याच विश्वस्तांच्या उपस्थीत हनुमान जन्मोत्सव सोहळा पार पडला.