coronavirus : कसे जाणार २१ दिवस; हातावर पोट असलेल्या पालावरील १०० कुटुंबावर उपासमारीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 12:47 PM2020-03-25T12:47:56+5:302020-03-25T12:49:03+5:30
हाताला काम नाही ,तसेच बाहेर देखील निघायचे नाही म्हणून झोपड़ी समोर सावली करून सर्वजण दिवस काढत आहेत.
गंगापुर :- हातावर पोट घेऊन फिरणाऱ्या पालावरील सुमारे १०० कुटुंबीय संचरबंदीमूळे अडचणीत सापडले आहेत.त्यांचे उपजीविकेचे साधनच बंद पडल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येवून ठेपली आहे.
कोरोना विषाणुच्या प्रकोपाने शासनाने सर्व शासकीय,निमशासकिय,कार्यालये तसेच बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश दिले एवढेच नाही तर विषानुचा फैलाव रोखण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातील लोकांनी घराबाहेर पडू नये असे आदेश काढल्याने सर्वच यंत्रणा थांबली आहे.
सर्वसाधारण कुटुंबाकडे किमान महीनाभर पुरेल असा किराणा भरलेला असतो मात्र रोज काम करायचे आणि सायंकाळी रोजंदारी मिळाल्यावर पोटाची खळगी भरायची असे कुटुंब आता अडचणीत आले आहेत . गंगापुर शहरात बाहेर गावाहून पोट भरन्यासाठी जवळपास १०० कुटुंब दाखल झालेले आहेत
लासुर मार्गावरील क्रीडांगण समोरिल मैदान, समता नगर ,अखिलेशनगर, वाडी रस्ता आदी ठिकाणी असे ऊताकरु झोपड़ी वजा पाल ठोकुन वास्तव्य करीत आहेत. सकाळी उठून सुया पोत ,केसावर फुगे,प्लास्टीक गोळा करणे, गोधड्या शिवनकाम,भंगार जमा करुण आपला व आपल्या कुटुंबियाचे पालन पोषण करण्याचा नित्यक्रम आहे.मात्र गेला आठवड़ा भरापासुन हाताला कामधंदा मिळत नसल्यामुळे या लोकावर उपास मारीची वेळ येऊन ठेपली आहे.
कोरोनाची लागण होवू नये यासाठी शासनाने घराबाहेर निघू नये आसे आदेश दिले या आदेशाचे तंतोतंत पालन करीत ही लोक आपल्या झोपड़ित थांबली आहेत.मात्र पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाने स्वस्त धान्य दुकानातील धान्य, तांदूळ, साखर,गोड़तेल,डाल आदि किराना एका पिशवित भरून प्रत्येक कुटुंबाला एक पिशवी या प्रमाणे महिनाभराचे राशन दिल्यास या लोकांची अड़चन दूर होणार आहे. या साठी शहरातील काही समाजसेवक देखील या लोकांना धान्य मिळावे या साठी प्रयत्न करीत आहेत समाज सेवकाना शहरातील दानवीर लोकांनी तसेच तहसील पुरवठा विभागाने मदत केल्यास त्यांचा प्रयत्न सहज शक्य आहे .