Coronavirus In Aurangabad : कोरोनाबाधित ११३ रुग्णांची वाढ; एकूण रुग्णसंख्या ८५७७

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 11:00 AM2020-07-13T11:00:25+5:302020-07-13T11:04:32+5:30

जिल्ह्यात सध्या ३१६२ जणांवर उपचार सुरु आहेत. 

Coronavirus: An increase of 113 coronavirus patients | Coronavirus In Aurangabad : कोरोनाबाधित ११३ रुग्णांची वाढ; एकूण रुग्णसंख्या ८५७७

Coronavirus In Aurangabad : कोरोनाबाधित ११३ रुग्णांची वाढ; एकूण रुग्णसंख्या ८५७७

googlenewsNext
ठळक मुद्दे३५४ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू ५०६१ जण बरे होऊन घरी परतले आहेत

औरंगाबाद : जिल्ह्यातील ११३ रुग्णांचे अहवाल सोमवारी सकाळी कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत ८५७७ कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी ५०६१ जण बरे होऊन घरी परतले. तर  ३५४ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याने ३१६२ जणांवर उपचार सुरु आहेत.

नव्याने आढळून आलेल्या रुग्णांची शहर प्रवेशवेळी अँटीजेन टेस्टद्वारे केली असता त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आढळून आल्या ११३ रुग्णांत शहरी भागातील १०२ तर ग्रामीण भागातील ११ रुग्णांचा समावेश आहे.

मनपा हद्दीत १०२ रुग्ण 
रमा नगर १, सादात नगर, रेल्वे स्टेशन परिसर २,भावसिंगपुरा १, मयूर पार्क ५, कँटोंमेट जनरल हॉस्पीटल परिसर (1), छावणी १, पद्मपुरा ३, एकनाथ नगर ३, शिवशंकर कॉलनी ८, ज्ञानेश्वर कॉलनी १, भानुदास नगर, आकाशवाणी परिसर १, मित्र नगर ४, उत्तरा नगरी, धूत हॉस्पीटलमागे १, अंगुरी बाग १, अरिहंत नगर १, एन सहा सिडको ४, एन चार सिडको १, सेव्हन हिल २, गजानन कॉलनी १, जाधववाडी १, तिरूपती कॉलनी १, विष्णू नगर ४, आयोध्या नगरी २, कांचनवाडी १, चिकलठाणा ३, विवेकानंद नगर, एन बारा हडको १, कोहिनूर गल्ली रोड १, एन नऊ पवन नगर १,एन सात, सिडको १, जय भवानी नगर १, देवळाई चौक, बीड बायपास १, रेणुका नगर, शिवाजी नगर १०, गुरूप्रसाद नगर, बीड बायपास १, जालान नगर १, एसआरपीएफ कॅम्प, सातारा १, जय नगरी, बीड बायपास ३, आयोध्या नगर १३, श्रीकृष्ण नगर २, रायगड नगर १, नारेगाव १,  नक्षत्रपार्क नक्षत्रवाडी २, उस्मानपुरा १, बजाज नगर ३, अमेर नगर, बीड बायपास १, सातारा परिसर १, गारखेडा १

ग्रामीण भागातील ११ रुग्ण 

लोनवाडी, सिल्लोड १, दहेगाव, वैजापूर १, वडगाव कोल्हाटी १, गांधी नगर, रांजणगाव १, पांडुरंग सो., बजाज नगर १, अरब मोहल्ला, अजिंठा १, हनुमान नगर, अजिंठा १,  रेणुका नगर, अजिंठा २, तेलीपुरा गल्ली १, मातोश्री नगर, रांजणगाव १ या भागातील कोरोनाबाधित आहेत.

Web Title: Coronavirus: An increase of 113 coronavirus patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.