coronavirus : औरंगाबादेत ३० रुग्णांची वाढ , कोरोना @१३६०
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 08:38 AM2020-05-27T08:38:56+5:302020-05-27T08:39:30+5:30
यामध्ये ९ महिला आणि २१ पुरुष रुग्णांचा समावेश आहे.
औंरगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात बुधवारी ३० कोरोनाबाधित रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकुण संख्या १३६० झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
औरंगाबादमध्ये बुधवारी गंगापुर (१), मिसारवाडी (१), सिध्देश्वर नगर, जाधववाडी (१), शहानवाज मस्जिद परिसर (१), सादात नगर (१), भवानीनगर, जुना मोंढा (१),जुना बाजार (१),जहागीरदार कॉलनी (२),ईटखेडा परिसर (१),जयभिम नगर (१), शिवशंकर कॉलनी (२), सुभाषचंद्र बोस नगर (४), अल्तमश कॉलनी (१), शिवनेरी कॉलनी एन-९ (१), टिळक नगर (१), एन-४ सिडको (१), रोशन गेट परिसर (१), सादाफ नगर रेल्वे स्टेशन परिसर (१), हमालवाडी, रेल्वे स्टेशन परिसर (१), भाग्यनगर (१), जय भवानी नगर (३), समता नगर (१), सिल्लोड (१) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये ९ महिला आणि २१ पुरुष रुग्णांचा समावेश आहे.