coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात ४९ कोरोनाबाधितांची वाढ, ३ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 10:17 AM2020-08-06T10:17:03+5:302020-08-06T10:18:32+5:30
जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १५ हजार ५४० एवढी झाली आहे.
औरंगाबाद : जिल्ह्यातील ४९ रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. तर तीन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
खासगी रुग्णालयात एन बारा हडकोतील ५२ वर्षीय पुरूष आणि जाधववाडीतील ४९, अरिहंत नगरातील ६१ वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १५ हजार ५४० एवढी झाली आहे. त्यापैकी ११ हजार ५२१ बरे झाले तर ५०३ जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या ३५१६ जणांवर उपचार सुरु आहेत.
मनपा हद्दीत ३८ रुग्ण
एन सहा सिडको १, बन्सीलाल नगर १, क्रांती नगर ४, मिलिट्री हॉस्पीटल, छावणी १, सिडको एन पाच, श्री नगर १, शहानूरमियाँ दर्गा परिसर १, प्रकाश नगर ३, समृद्धी नगर,एन चार सिडको १, मुकुंदवाडी १, औरंगपुरा २, संभाजी कॉलनी,एन सहा सिडको १, संतोषीमाता मंदिर, मुकुंदवाडी १, मल्हार चौक, गारखेडा १, कांचनवाडी १, शिवशंकर कॉलनी २, बालाजी नगर १, जे सेक्टर, मुकुंदवाडी १, शिवनेरी कॉलनी १, विष्णू नगर, आकाशवाणी १, न्यू विशाल नगर, गजानन मंदिर परिसर १, एस टी कॉलनी, फाजिलपुरा १, एन नऊ, पवन नगर २, मातोश्री नगर, पुंडलिक नगर १, सातारा पोलिस स्टेशन परिसर १, नागेश्वरवाडी १, राजा बाजार १, कर्णपुरा, छावणी परिसर १, अहिल्याबाई होळकर चौक, पद्मपुरा २, अन्य १
ग्रामीण भागात ११ रुग्ण
बाजार गल्ली, अब्दीमंडी १, आयोध्या नगर, बजाज नगर २, बीएसएनएल गोडाऊन जवळ, बजाज नगर ३, जय हिंद चौक, बजाज नगर १, गणेश सो., आंबेडकर चौक, बजाज नगर १, शफेपूर, कन्नड १, पिंप्री राजा १, सारंगपूर, गंगापूर १