coronavirus : औरंगाबादेत ७० कोरोनाबाधितांची वाढ; रुग्णसंख्या ३१०६ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 10:30 AM2020-06-18T10:30:30+5:302020-06-18T10:31:18+5:30
सध्या १२२४ रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद : जिल्ह्यात गुरुवारी ७० कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३१०६ झाली आहे. यापैकी १७१६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून १६६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता १२२४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.
आढळलेल्या रुग्णांत घाटी रुग्णालय परिसर १, नॅशनल कॉलनी १, सिंधी कॉलनी १, पहाडसिंगपुरा १, न्यू हनुमान नगर १, पडेगाव १, लक्ष्मी कॉलनी २, हर्सुल, जटवाडा १, म्हसोबा नगर, मयूर पार्क १, खोकडपुरा ३, जय भवानी नगर, गल्ली नं. चार २, एन आठ सिडको २, एन नऊ,सिडको २, महू नगर १, गजानन नगर, गल्ली नं. नऊ, गारखेडा १, शिवाजी नगर, गारखेडा १, एन बारा, हडको १, कैसर कॉलनी २, चिकलठाणा १, नंदनवन कॉलनी २,मिसारवाडी १, नूतन कॉलनी २, गांधी नगर १, मुकुंदवाडी १, हर्सूल मध्यवर्ती कारागृह निवास परिसर १, नागेश्वरवाडी १, श्रीराम नगर १, रामेश्वर नगर १, न्यू विशाल नगर १, आझाद चौक ३, पुंडलिक नगर १, स्वामी विवेकानंद नगर १, हरीकृष्ण नगर, बीड बायपास १, श्रीविहान कॉलनी १, शक्ती अपार्टमेंट १, गणेश कॉलनी २, एमजीएम हॉस्पीटल परिसर १, जाधववाडी, नवीन मोंढा १, साई नगर, सिडको १, टीव्ही सेंटर १, सावित्री नगर, चिकलठाणा १, बन्सीलाल नगर १, औरंगपुरा १, सुभाषचंद्र नगर, एन अकरा १, जय भवानी नगर, गल्ली नं. एक १, रामदेव नगर १, बजाज नगर २, सावरकर कॉलनी, बजाज नगर १, त्रिमूर्ती चौक, बजाज नगर १, इंदिरा नगर, पंढरपूर २, जय भवानी चौक, बजाज नगर ५, सिडको महानगर दोन १ या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये ३१ स्त्री व ३९ पुरूष रुग्णांचा समावेश आहे.