Coronavirus: भयावह! औरंगाबादेत १३ वर्षीय मुलीचा कोरोनाने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 05:29 AM2021-04-19T05:29:36+5:302021-04-19T05:29:53+5:30
लहान मुलांवरील कोरोनाचे संकट वाढत असून, आंबेडकरनगर येथील १३ वर्षीय मुलीचा घाटीत उपचार सुरू असताना रविवारी सकाळी मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : लहान मुलांवरील कोरोनाचे संकट वाढत असून, आंबेडकरनगर येथील १३ वर्षीय मुलीचा घाटीत उपचार सुरू असताना रविवारी सकाळी मृत्यू झाला. उपचारासाठी दाखल झाल्यानंतर दुर्दैवाने तिसऱ्याच दिवशी या मुलीचा मृत्यू झाला. गेल्या २० दिवसांत लहान मुलांमधील हा पाचवा बळी आहे.
कोरोनाची लागण झाल्यामुळे या मुलीला १६ एप्रिल रोजी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात भरती होतानाच मुलीची प्रकृती गंभीर होती. त्यामुळे तिला अतिदक्षता कक्षात हलविण्यात आले. उपचारासाठी डाॅक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र, दुर्दैवाने उपचार सुरू असताना, रविवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास तिने अखेरचा श्वास घेतला. सदर मुलीच्या दोन्ही फुप्फुसात न्युमोनाइटीस आढळला. रक्ताच्या गाठी, सेप्टिसिमिया व सेप्टिक शाॅक आणि कावीळही झाला होता, असे घाटीतील डाॅक्टरांनी सांगितले.
यापूर्वीचे मृत्यू
घाटीत गेल्या २० दिवसांत २९ दिवसांचे बाळ, ६ महिन्यांची मुलगी,
३ वर्षीय बालिका आणि १४ वर्षांच्या मुलाचा उपचार सुरू असताना कोरोनामुळे मृत्यू झाला होता. आता १३ वर्षीय मुलीचा कोरोनाने बळी घेतला.