coronavirus : दिलासादायक ! दिवसभरात नव्या पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा सुटी झालेले रूग्ण अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2020 10:45 PM2020-09-01T22:45:38+5:302020-09-01T22:51:10+5:30

औरंगाबाद जिल्ह्यात २३४ रुग्णांची वाढ, ९ रुग्णांचा मृत्यू

coronavirus: more discharged patients than new positive patients throughout the day | coronavirus : दिलासादायक ! दिवसभरात नव्या पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा सुटी झालेले रूग्ण अधिक

coronavirus : दिलासादायक ! दिवसभरात नव्या पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा सुटी झालेले रूग्ण अधिक

googlenewsNext
ठळक मुद्दे४३९१ रुग्णांनावर उपचार सुरूएकूण कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची संख्या ७०७ झाली आहे. 

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात मंगळवारी दिवभरात २३४ रुग्णांची वाढ झाली, तर माजलगाव-बीड येथील एक रूग्ण आणि जिल्ह्यातील ८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. नव्या पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा सुटी झालेले रूग्ण अधिक राहिली. दिवसभरात २९४ जणांना सुटी देण्यात आली.

जिल्ह्यातील एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या २३, ६९४ झाली आहे. यातील आतापर्यंत १८, ५९६ रूग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची संख्या ७०७ झाली आहे. आजघडीला ४३९१ रुग्णांवर उपचार सुरू आहे. 

हडको येथे ७० वर्षीय महिला, एन सात, सिडको, अयोध्यानगरातील ६३ वर्षीय पुरूष, मुकुंदवाडीतील ६५ वर्षीय महिला, सोयगावातील नारळीबाग येथील ७७ वर्षीय पुरूष, जटवाडा येथील ४८ वर्षीय महिला, राज नगर, मुकुंदनगर येथील ४० वर्षीय पुरूष , सिडकोतील ६५ वर्षीय पुरूष, सिल्लोडमधील ५६ वर्षीय पुरूष कोरोनाबाधिताचा आणि माझलगाव-बीड येथील ६६ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

ग्रामीण भागातील रुग्ण : 
औरंगाबाद ८, गंगापूर १६, कन्नड ७, वैजापूर ५, पैठण ५ गणेश चौक, वाळूज ७, जैनपुरा, पैठण २, महादेव नगर, पैठण १, इंदिरा नगर, पैठण १, पाटोदे वडगाव, पैठण २, शिक्षक कॉलनी, सिल्लोड १, पोलिस स्टेशन सिल्लोड १, स्टेशन रोड, वैजापूर १, शास्त्री नगर, वैजापूर २, काटेपिंपळगाव १, रांजणगाव, शेणपूजी १, अंधारी, सिल्लोड १, बजाज नगर २, रांजणगाव, वाळूज १, यशोदीप सो., बजाज नगर १, जामगाव, गंगापूर ६, देर्डा, गंगापूर ६ अहिल्यादेवी नगर, गंगापूर १, माऊली नगर, गंगापूर १, शिवाजी नगर, सिल्लोड १, ग्रामीण पोलिस स्टेशन परिसर, कन्नड २, छत्रपती विहार, कमलापूर १, शशी विहार, पैठण १

मनपा हद्दीतील रुग्ण :
समर्थ नगर २, बन्सीलाल नगर ३, पारिजात नगर १, भानुदास नगर १, शिवाजी नगर १, रेणुकामाता मंदिर परिसर, सातारा परिसर ४, शहांगज परिसर १, राजर्षी शाहू नगर, बीड बायपास १, यशवंत नगर, बीड बायपास १, पडेगाव १, संजय नगर, बायजीपुरा १, एमजीएम हॉस्पीटल परिसर १, इंद्रनील अपार्टमेंट परिसर, वेदांत नगर २, रचनाकार कॉलनी, स्टेशन रोड १, साई नगर, एन सहा सिडको १, प्रताप नगर, देवानगरी १, टीव्ही सेंटर, सी क्वार्टर २, उल्कानगरी १, गोल्डन सिटी, पैठण रोड १, पवन नगर, हडको १, ज्योती नगर १, धूत हॉस्पीटल १, भाग्य नगर २, देवळाई परिसर, बीड बायपास २, गादिया विहार १, महेश नगर १, शिवेश्वर कॉलनी, मयूर पार्क १, मिलिट्री हॉस्पीटल १, वेदांत नगर १, गणेश नगर, गारखेडा १, नागेश्वरवाडी १, बायजीपुरा १, अहिंसा नगर २, विद्यानिकेतन कॉलनी १, कांचनवाडी १, चौधरी कॉलनी, चिकलठाणा १, एन पाच सिडको १, ठाकरे नगर १

सिटी एंट्री पॉइंटवरील रुग्ण :
मयूर पार्क ३, वानखेडे नगर १, सुरेवाडी १, पुंडलिक नगर १, त्रिमूर्ती चौक १, छावणी १, लिंबे जळगाव २, हनुमान चौक,चिकलठाणा १, जय भवानी नगर १, एन-पाच, सावरकर चौक १, शहानूरवाडी १, एसआरपीएफ कॅम्प, सातारा परिसर ३, बीड बायपास १, शिवाजीनगर ४, सातारा परिसर २, एन-अकरा, टीव्ही सेंटर १, जाधववाडी १, मिटमिटा २, टीव्ही सेंटर १, गांधेली परिसर एल अँड टी कंपनी १, बिडकीन एल अँड टी १, वैजापूर १, चिकलठाणा २, पडेगाव १, करमाड १, चौधरी कॉलनी १, लाडगाव १

Web Title: coronavirus: more discharged patients than new positive patients throughout the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.