coronavirus : थाटात झालेल्या साखरपुड्यानंतर नवरदेव निघाला पॉझिटिव्ह; अजिंठ्यात खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 07:53 PM2020-06-11T19:53:12+5:302020-06-11T19:54:03+5:30
साखरपुड्यात होते जवळपास १०० नागरिक उपस्थित
सिल्लोड : अजिंठा येथे 7 जून रोजी एकाच घरात दोन साखरपुडे झाले त्यात 100 लोकांच्यावर नागरिक उपस्थित होते. दोन दिवसानंतर त्यातील एक नवरदेव औरंगाबाद येथे पॉझिटिव्ह सापडल्याने अजिंठ्यात खळबळ उडाली आहे. औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात लॅबोरेटरीमध्ये काम करताना एका कोरोनाबाधित इसमाच्या संपर्कात आल्याने त्या 23 वर्षीय नवरदेवास कोरोना झाल्याचे वृत्त आहे. ही माहिती कळताच त्या नवरदेवाचे कुटुंबीय व साखरपुड्याला गेलेले नातेवाईकांमध्ये घबराहट पसरली आहे.
अजिंठा येथील तेलीपुरा गल्लीत 7 जून रोजी एकाच घरातील दोन मुलींचा साखरपुडा आयोजीत करण्यात आला होता. एक नवरदेव औरंगाबाद येथील तर एक नवरदेव अटनगाव येथील होता वरात अजिंठ्यात आली दोन्ही कडील मिळून 100 च्यावर लोक या साखरपुड्याला हजर होते. यानंतर एक नवरदेव जेव्हा औरंगाबाद येथे परतला तेव्हा त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात तो पॉझिटिव्ह निघाला. प्रशासनाने खबरदारी म्हणून त्याच्या कुटुंबातील 40 लोकांना होमक्वारंनटाईन केले आहे.
घटनेची माहिती मिळताच गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे, पर्यवेक्षिका अनिता राठोड, रेखा कापकर, आरोग्य सेवक वाय. एन.सपकाळ, सरपंच दुर्गाबाई पवार, राजेश ठाकरे, अली चाऊस, आशा स्वयंसेवीका दुर्गाबाई पुरे, सध्या बोरारे, पौर्णिमा बिरारे, शिवना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने जवळपास 40 लोकांना होम कोरटाईन केले आहे. दोन दिवसात जवळून संपर्कात आलेल्या 12 लोकांचे स्वेब घेण्यात येतील अशी माहिती डॉ.जवेरीया यांनी दिली.