coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या ४५ हजार पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 05:27 PM2020-12-23T17:27:19+5:302020-12-23T17:30:31+5:30

coronavirus in Aurangabad : सध्या जिल्ह्यात ६०५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत 

coronavirus: The number of corona patients in Aurangabad district has crossed 45,000 | coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या ४५ हजार पार

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या ४५ हजार पार

googlenewsNext
ठळक मुद्देमंगळवारी ९२ कोरोना रुग्णांची वाढ दोघांचा मृत्यूआतापर्यंत १ हजार १९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ४३ हजार २६८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत

औरंगाबाद : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांच्या तुलनेत मंगळवारी नव्या कोरोनाबाधितांत थोडी वाढ झाली. दिवसभरात ९२ कोरोना रुग्णांची भर पडली असून, ६४ जण कोरोनामुक्त झाले. त्याचप्रमाणे २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४५ हजार ६४ झाली आहे. 
जिल्ह्यातील आतापर्यंत ४३ हजार २६८ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, १ हजार १९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ६०५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ९२ रुग्णांत मनपा हद्दीतील ७६, ग्रामीण भागातील १६ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ४४ आणि ग्रामीण भागातील २० अशा एकूण ६४ रुग्णांना मंगळवारी सुटी देण्यात आली. भावसिंगपुरा येथील ७३ वर्षीय पुरुष, भानुदासनगरातील ४४ वर्षीय पुरुष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण
शरनापूर, मिटमिटा  ३, सैनिक कॉलनी, पडेगाव २,  मयूरपार्क १,  जयभवानीनगर १,  गणेशनगर ३, एन-२ सिडको २, मुकुंदवाडी ४, पुंडलिकनगर ४,  म्हाडा कॉलनी  १,  वानखेडेनगर १,  विद्यानगर, सेवन हिल १, देवळाई रोड १,  ठाकरेनगर, एन-२, सिडको ३, एन-६ सिडको ३, नारेगाव, माणिकनगर २, हर्सूल टी पॉईंट १,  सातारा परिसर १, दिशानगरी, बीड बायपास १,  किराडपुरा १,  पदमपुरा १,  राजाबाजार १, शेंद्रा एमआयडीसी १,  रेल्वे स्टेशन परिसर २, अन्य ३२, हनुमाननगर १, कॅनॉट प्लेस १, अभिमान सोसायटी १. 

ग्रामीण भागातील रुग्ण
चितेगाव १,  सिल्लोड १,  खुलताबाद १, वडजी, डावरवाडी १,  अन्य १२.

रेल्वे स्टेशनवर सहा प्रवासी पॉझिटिव्ह
 महापालिकेची तीन पथके विमानतळ व रेल्वेस्टेशनवर २४ तास कार्यरत आहे. मंगळवारी दिवसभरात २७६ प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली. तर सोमवारी केलेल्या चाचण्यांतून रेल्वेस्टेशनवरील ६ प्रवाशांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. मंगळवारी दिवसभरात रेल्वेस्टेशनवर सचखंड एक्स्प्रेसने आलेल्या एकूण २४७ प्रवाशांची कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. 

Web Title: coronavirus: The number of corona patients in Aurangabad district has crossed 45,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.