Coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १४ हजार पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 10:42 PM2020-07-31T22:42:46+5:302020-07-31T23:02:13+5:30

शुक्रवारी जिल्ह्यात २८१ रुग्णांची भर, ७ मृत्यू

Coronavirus: The number of coronavirus in Aurangabad district has crossed 14,000 | Coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १४ हजार पार

Coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १४ हजार पार

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यात १०,१९२ कोरोनामुक्तसध्या ३४५६ रुग्णांवर उपचार सुरु आहेतआजपर्यंत ४७५ रुग्णांचा मृत्यू झाला

औरंगाबाद ः जिल्ह्यात २८१ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. तर जिल्ह्यातील ६ तर गेवराई येथील एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. दिवसभरात २३१ रुग्णांना सुटी देण्यात आली. त्यात शहरातील १३० तर ग्रामीण भागातील १०१ रुग्णांचा समावेश असुन आतापर्यंतच्या बाधितांचा एकुण आकडा १४ हजार तर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १० हजार पार पोहचली आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात एकुण १४ हजार १२३ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यापैकी आतापर्यंत १० हजार १९२ रुग्ण उपचार पुर्ण होऊन घरी परतले. तर आजपर्यंत ४७५ रुग्णांचा मृत्यू झाला असुन ३४५६ रुग्णांवर उपचार सुरु आहे. अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर ३५, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ७० आणि ग्रामीण भागात १०० रूग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

७ बाधितांचा मृत्यू
जिल्ह्यातील चाैघांसह गेवराई (जि. बीड) येथील एका बाधित रुग्णाचा उपचारदरम्यान घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. बाजार सावंगी येथील ७१ वर्षीय पुरुष, पैठण येथील ९५ वर्षीय महिला, वैजापूर येथील ६७ वर्षीय पुरुष, तुर्काबाद, खराडी येथील ६५ वर्षीय महिला मोमीनपुरा गेवराई (जि. बीड) येथील ४० वर्षीय रुग्णाचा मृतात समावेश आहे. तर खाजगी रुग्णालयात अजिंठ्यातील ६६ वर्षीय, वैजापुरातील ८१ वर्षीय पुरूष कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मनपा हद्दीत ५१ रुग्ण
एन पाच, सिडको १, हिलाल कॉलनी १, राजीव गांधी नगर १, शिवशंकर कॉलनी ७, मुकुंदवाडी १, इंदिरा नगर, गारखेडा १, त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी १, रेल्वे स्टेशन परिसर १, टाऊन हॉल, जय भीम नगर २, राम नगर १, मिसारवाडी १, मेडिकल क्वार्टर, घाटी परिसर १, दिल्ली गेट १, खोकडपुरा १, संत तुकाराम वसतीगृहाजवळ १, शिवाजी नगर २, कोटला कॉलनी १, अन्य १, बन्सीलाल नगर ३, पद्मपुरा १, पडेगाव २, एन सात सिडको १, एन सहा सिडको १, शिवशंकर कॉलनी १, मिलिट्री हॉस्पीटल १, सन्नी सेंटर, पिसादेवी रोड १, नवनाथ नगर, हडको १, जालान नगर १, चिकलठाणा १, नंदनवन कॉलनी १, बीड बायपास रोड १, हनुमान मंदिराजवळ १, मुलांचे वसतीगृह १, टीव्ही सेंटर १, देवळाई परिसर १, शिवाजी नगर १, एन नऊ सिडको १, गुलमोहर कॉलनी, पडेगाव २, एसआरपीएफ सातारा परिसर १

ग्रामीण भागात १२५ रुग्ण
भगवान गल्ली, बिडकीन १, अक्षयतृतीया अपार्टमेंट, बजाज नगर १ सिडको महानगर एक, वाळूज १, इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर १, बिडकीन, पैठण १, पाचोड, पैठण १, पानवाडी, जातेगाव १, बाजार गल्ली, फुलंब्री ५, देऊळगाव बाजार, फुलंब्री १, महाल किन्होळा, फुलंब्री ३, रांजणगाव शेणपूजी १, कन्नड १, भराडी,सिल्लोड १, वैजापूर १, जरंडी, सोयगाव २, पळशी १, पैठण १, अंबा, कन्नड १, औरंगाबाद १८, फुलंब्री ८, गंगापूर १२, खुलताबाद ८, सिल्लोड ६, वैजापूर १०, पैठण १६, सोयगाव २२

शहरप्रवेशावेळी आढळले ३५ रुग्ण
न्यू म्हाडा कॉलनी १, बजाज नगर २, जय भवानी नगर १, सावित्री फुले नगर १, वडगाव २, पडेगाव १, सावंगी १, आडगाव २, बालाजी नगर १, हर्सूल १, चितेगाव २, जाधववाडी १, चेतना नगर १, एन अकरा, यादव नगर १, एन बारा  स्वामी विवेकानंद नगर ४, सोयगाव २, खुलताबाद १, आसेगाव १, लिंबे जळगाव १, वाळूज २, गारखेडा १, पैठण २, चिकलठाणा १, बीड बाय पास १, अन्य १

Web Title: Coronavirus: The number of coronavirus in Aurangabad district has crossed 14,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.