coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा १७ हजार पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 10:24 PM2020-08-10T22:24:10+5:302020-08-10T22:28:38+5:30
भरती रुग्णांची संख्या ४ हजाराच्या उंबरठ्यावर पोहचली आहे.
औरंगाबाद : जिल्ह्यातील २९७ रुग्णांचे अहवाल सोमवारी सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा १७ हजार पार गेला असुन पुन्हा एकदा रुग्ण भरती असल्याची संख्या चार हजाराच्या उंबरठ्यावर पोहचली. तर ९ बाधितांचे उपचारादरम्यान मृत्यू झाले असुन १९१ जणांचे उपचार पुर्ण झाल्याने घरी परतले.
आतापर्यंत कोरोनाबधित रुग्णांची संख्या १७ हजार ५० झाली आहे. त्यापैकी १२ हजार ५३७ बरे झाले तर ५५८ जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या ३९५५ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर ६८, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ४१ आणि ग्रामीण भागात ९८ रूग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
९ कोरोनाबाधितांचा मृत्यू
खासगी रुग्णालयांमध्ये नारेगावातील ५८, गारखेड्यातील ३२ वर्षीय स्त्री, मुकुंदवाडीतील ५८, बीड बायपास येथील ६२ आणि जय भवानी नगरातील ३२ वर्षीय पुरूष, एन चार सिडकोमधील ५७ वर्षीय पुरूष तर बायजीपुरा येथील २७ वर्षीय महिला, शिवानी रोड, वैजापुरातील ६० पुरूष, कन्नड तालुक्यातील बेलखेडा येथील ५२ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात मृत्यू झाला.
शहरात आढळले ६४ रुग्ण
एन नऊ, सिडको १, बनेवाडी ४, नगारखाना गल्ली २, अजब नगर १, प्रियदर्शनी कॉलनी,सिडको १, कांचनवाडी १, हिंदुस्तान आवास, कांचनवाडी २, श्रीकृष्ण नगर १, मिलिट्री हॉस्पीटल १, ध्यान मंदिर, नारळीबाग १, साईकृपा सो., बजरंग चौक, एन सहा सिडको १, अन्य १, नाझलगाव १, घाटी परिसर १, एन आठ, आझाद चौक १, गजानन नगर १, श्रेय नगर १, शिवाजी नगर २, जवाहर नगर ४, गुरूदत्त नगर १, हर्सुल टी पॉइंट १, गणेश कॉलनी १, सह्याद्री हिल १, न्याय नगर २, एन दोन, पायलट बाबा नगर १, बालाजी नगर ३, गांधी नगर ४, नवयुग कॉलनी, भावसिंगपुरा १, राजीव गांधी नगर, मुकुंदवाडी ३, एन चार सिडको १, खंडोबा मंदिराजवळ, सातारा परिसर ८, पेठे नगर १, गारखेडा परिसर २, एन सात सिडको १, एन सहा सिडको १, जाधववाडी हर्सुल १, संग्रामनगर, सातारा परिसर १, हिंदुस्तान आवास, नक्षत्रवाडी १, भगतसिंग नगर १
ग्रामीण भागात १२४ रुग्ण
करमाड ३, गोपाळपूर १, वाळूज ४, पाचोड, पैठण १, बजाज नगर १, सारा वृंदावन सो., बजाज नगर १, देवगिरी सो., बजाज नगर २, छत्रपती नगर, वडगाव १, गोपीनाथ चौक, बजाज नगर १, पिशोर, कन्नड १, चित्तेगाव १, मेन रोड, सिल्लोड १, पैठण १, एकलेहरा, गंगापूर १, शिवना, गंगापूर १, मारोती मंदिराजवळ, सलामपूर, वडगाव १, औरंगाबाद ९, फुलंब्री ५, गंगापूर ४४, कन्नड ५, खुलताबाद ३, सिल्लोड १३, वैजापूर ९, पैठण १०, शिऊर, वैजापूर १, रांजणगाव २, कमलापूर १
शहर प्रवेशावेळी आढळले ६८ रुग्ण
जोगेश्वरी १, अडूळ, पैठण १, टीव्ही सेंटर १, सातारा परिसर १, चित्तेगाव १, अन्य ६, फुले नगर १, शिवेश्वर कॉलनी २, राधा स्वामी कॉलनी १, जाधववाडी ४, राजे संभाजी कॉलनी २, सावंगी १, जटवाडा ५, सिल्लोड १, एन बारा ४, समृद्धी महामार्ग कर्मचारी २, भक्ती नगर १, भावसिंगपुरा ३, एल अँड टी कंपनी कर्मचारी २, वैजापूर १, मुकुंदवाडी १, राम नगर १, पडेगाव १, रांजणगाव २, हर्सूल १, बजाज नगर १, पंढरपूर १, वाळूज ३, आलोक नगर १, देवा नगर १, उल्हास नगर १, आत्रा फार्म वाळूज १, छावणी १, म्हाडा कॉलनी १, भारत माता नगर १, एकता नगर १, एसआरपीएफ, सातारा परिसर ४, पैठण १.