coronavirus : औरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांची वाटचाल दोन हजाराकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 12:02 PM2020-06-06T12:02:52+5:302020-06-06T12:03:44+5:30
हर्सूल कारागृहात २९ बाधीत
औरंगाबाद : जिल्ह्यात ९० कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या १९३६ झाली. तर एका बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती शनिवारी प्रशासनाने दिली. आतापर्यंत ११५९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून ९६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ६८१ रुग्णांवर उपचार सुरू असून एकूण बाधितांच्या आकड्याची जिल्ह्यातील वाटचाल दोन हजाराकडे सुरू झाली आहे.
कोरोना आढळलेल्या बाधीत आढळलेल्या रुग्णांत पिंपळगाव देवशी, गंगापूर १, भवानी नगर २, राधास्वामी कॉलनी १, भारतमाता नगर, एन १२ येथील १, हर्सुल परिसर १, गारखेडा परिसर ३, मिल कॉर्नर २, अहिंसा नगर १, शिवशंकर कॉलनी १, आकाशवाणी परिसर १, न्याय नगर १, कैलास नगर १, आंबेडकर नगर २, एन ११ टी.व्ही सेंटर २, एन आठ, सिडको २, रोशन गेट ५, बीड बायपास रोड १, हुसेन कॉलनी ३, हनुमान नगर १, गादिया विहार, शंभू नगर १, तोफखाना, छावणी १, पीर बाजार उस्मानपुरा ३, भीमनगर, भावसिंगपुरा २, जुनी मुकुंदवाडी १,संजय नगर २, पदमपुरा १,समता नगर १, युनुस कॉलनी १, जुना बाजार १, जय भीम नगर १, गौतम नगर १, नॅशनल कॉलनी २, लेबर कॉलनी ३, देवडी बाजार १, वेदांत नगर १, बुद्ध नगर, जवाहर कॉलनी १, अल्तमश कॉलनी १, पैठण गेट १, रेहमानिया कॉलनी १, पिसादेवी रोड १, हर्सूल जेल २९ अन्य १ या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये २१ महिला आणि ६९ पुरुष रुग्णांचा समावेश आहे.
-
कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू
--
चंपा चौकातील ५० वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा शुक्रवारी दुपारी ३.१५ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ९६ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.