coronavirus : औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णसंख्या अठराशे पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 09:13 AM2020-06-05T09:13:34+5:302020-06-05T09:15:09+5:30
५९ रुग्णांची वाढ, १ मृत्यू
औरंगाबाद : जिल्ह्यात ५९ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ तर एका ३० वर्षीय बाधीत प्रसूत महिलेचा मृत्यू झाला. अशी माहिती शुक्रवारी (दि ५) सकाळी दिली. एकूण कोरोनाबाधितांची संख्या १८२८ यापैकी ११३२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले.तर आतापर्यंत ९३ मृत्यू झाले असून ६०३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
भारतमाता नगर १, इंदिरानगर न्यू बायजीपुरा १, न्यू कॉलनी, रोशन गेट १, भावसिंगपुरा १, त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी १, बेगमपुरा १, चिश्तिया कॉलनी १, फाझलपुरा १, रेहमानिया कॉलनी १, गांधी नगर १, युनूस कॉलनी २, जुना मोंढा, भवानी नगर १, शुभश्री कॉलनी, एन सहा १, संत ज्ञानेश्वर नगर, एन ९ येथील १, आयोध्या नगर, एन सात ७, बुडीलेन ३, मयूर नगर, एन अकरा १, विजय नगर, गारखेडा ३ सईदा कॉलनी १, गणेश कॉलनी १, एसटी कॉलनी, फाजलपुरा १, रोशन गेट परिसर १, भवानी नगर, जुना मोंढा १, औरंगपुरा २, एन आठ सिडको १, समता नगर ४, मिल कॉर्नर २, जवाहर कॉलनी ३, मोगलपुरा २, जुना मोंढा १, नॅशनल कॉलनी १, राम मंदिर, बारी कॉलनी १, विद्यानिकेतन कॉलनी १, देवडी बाजार १, एन सात सिडको १, एन बारा १, आझाद चौक १, टी.व्ही. सेंटर एन अकरा १, कैलास नगर १, अन्य १ असे १९ महिला आणि ४० पुरुष रुग्णांचा समावेश आहे.
कोरोनाबाधित मातेचा मृत्यू
नेहरू नगर, कटकट गेट येथे राहणाऱ्या ३० वर्षीय प्रसूत कोरोनाबाधित महिलेचा चार जून रोजी दुपारी दोन वाजता मृत्यू झाला. जिल्ह्यात एकूण ९३ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.