coronavirus : औरंगाबादेत कोरोनाबाधितांचा आकडा दीड हजार पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 09:43 AM2020-05-31T09:43:22+5:302020-05-31T09:43:59+5:30
४२ रुग्णांची वाढ, एकूण बाधितांचा आकडा १५४०
औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी सकाळी ४२ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. एकूण कोरोनाबाधितांची संख्या १५४० झाली असून यापैकी ९८४ कोरोनाबधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर ४८७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
भवानी नगर, जुना मोंढा- ४, कैलास नगर, गल्ली नं. दोन-३, एन सहा, सिडको-३, जाफर गेट, जुना मोंढा-१, गल्ली नं १७, संजय नगर मुकुंदवाडी-१, गल्ली नं. चार रहीम नगर, जसवंतपुरा-१, व्यंकटेश नगर, जालना रोड-१, समता नगर-१, नवीन बायजीपुरा-१, अहिंसा नगर, आकाशवाणी परिसर -१,किराडपुरा- ३, पिसादेवी रोड -१, बजाज नगर- १, देवळाई परिसर -१, नाथ नगर -१, बालाजी नगर -१, हमालवाडी -१, जुना बाजार -२, भोईवाडा -१, मनजित नगर, आकाशवाणी परिसर -२, सुराणा नगर- १, अझम कॉलनी- १, सादात नगर -१, महेमुदपुरा, हडको -१, निझामगंज कॉलनी -१, शहागंज -१, गल्ली नं. २४ संजय नगर -१, बीड बायपास रोड- १, स्वप्न नगरी -१, अन्य -२ या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये २४ महिला आणि १७ पुरुष रुग्णांचा समावेश आहे.