CoronaVirus : आकाशाच्या मंडपात पानाफुलांच्या अक्षदा; वधू-वरासह केवळ १० जणांच्या साक्षीने झाला विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 06:47 PM2020-04-17T18:47:20+5:302020-04-17T18:50:41+5:30

निसर्गरम्य वातावरणात मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत गुरुजींनी विधी पूर्वक लग्नाची रेशीमगाठ बांधली.

CoronaVirus: Only 10 with the bride and groom in a marriage at Kannad | CoronaVirus : आकाशाच्या मंडपात पानाफुलांच्या अक्षदा; वधू-वरासह केवळ १० जणांच्या साक्षीने झाला विवाह

CoronaVirus : आकाशाच्या मंडपात पानाफुलांच्या अक्षदा; वधू-वरासह केवळ १० जणांच्या साक्षीने झाला विवाह

googlenewsNext
ठळक मुद्देवधू- वराने घातला होता मास्कसोशल डिस्टनसिंगचे केले सर्वांनी पालन

कन्नड - ना मंडप ना सनई चौघडा . आकाशाचा केला मंडप शेतातील झाडाची सावली आणि पक्ष्यांची किलबिलच झाले वाद्य. अशा या निसर्गरम्य वातावरणात मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत गुरुजींनी विधी पूर्वक लग्नाची रेशीमगाठ बांधली. आणि दुचाकीवर आलेल्या वऱ्हाडीसमवेत नववधु सासरी गेली.

नागद परीसरातील हरसवाडी येथे शेतजमीन ( गट क्र. ११ ) मध्ये आकाशाच्या मंडपात बदामाच्या झाडाखाली सुकलाल परदेशी यांची कन्या  दिपाली हिचा विवाह  सुपडू महादु मरमट रा. वाकी ता. जामनेर जि. जळगाव यांचा मुलगा वर करण याच्या सोबत सोमवारी ( दि.१३ ) पार पडला.

विवाहासाठी वरासहित चार जण दुचाकीवरून आले होते. तर वधु कडून ही केवळ वधु सहीत केवळ ६ जण, गुरुजी आणि तीन पोलीस कर्मचारी उपस्थित होते. विवाह स्थळी सोशल डिस्टन्सिंगच्या पालनाबरोबरच वधुवरासहीत सर्वांनी चेहऱ्यावर मास्क बांधले होते. परदेशी समाजातील हा विवाह सोहळा त्यांच्या रुढी परंपरानुसार पार पडला. विवाह विधी पूर्ण झाल्यानंतर नववधुला घेऊन वऱ्हाडी दुचाकीवरूनच आपल्या गावी परतले.                                                                 

 ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोनि. सुनिल ऩेवसे यांच्या मार्गदर्शन खाली नागद पोलीस चौकीचे जमादार जे. पी सोनवणे, पोलीस हेड कॉन्सटेबल गणेश जैन, पोलीस पाटील दिपक कृष्णा कोळी यांच्या उपस्थीतीत हा विवाह सोहळा कार्यक्रम पार पडला. कोरोना विषाणुच्या पार्श्वभुमीवर अत्यंत मोजक्या वऱ्हाडींच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून पार पडलेल्या या विवाह सोहळ्याचे नागद भागात सर्वञ कौतूक होत आहे.

Web Title: CoronaVirus: Only 10 with the bride and groom in a marriage at Kannad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.