Coronavirus In Aurangabad : बाधितांचा आकडा ७ हजार पार; आणखी ७७ रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 09:21 AM2020-07-07T09:21:24+5:302020-07-07T09:25:32+5:30
परीक्षण करण्यात आलेल्या ७२५ स्वॅबपैकी आज ७७ अहवाल पॉझिटिव्ह
औरंगाबाद : जिल्ह्यात सकाळी ७७ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये औरंगाबाद मनपा हद्दीतील ७२ तर ग्रामीण भागातील ०५ रुग्ण आहेत. त्यामुळे एकूण बाधितांचा आकडा सात हजार पार गेला आहे.
नव्याने आढळलेल्या ३७ पुरूष तर ४० महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण ७०१७ कोरोनाबाधित आढळले असून त्यापैकी ३५७१ रुग्ण बरे झालेले असून ३१८ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने ३१२८ जणांवर उपचार सुरू आहेत. परीक्षण करण्यात आलेल्या ७२५ स्वॅबपैकी आज ७७ अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
मनपा हद्दीत ७२ रुग्ण
घाटी परिसर १, बेगमपुरा ४, सुरेवाडी १, पिसादेवी, गौतम नगर ३, बड्डीलेन २, जटवाडा रोड ३, कांचनवाडी १, आंबेडकर नगर,एन सात २०, सातारा परिसर ४, विष्णू नगर २, न्यू हनुमान नगर १, विजय नगर ११, विशाल नगर १, गौतम नगर १, लोटा कारंजा २, नागेश्वरवाडी ३, नारळीबाग ६, एकनाथ नगर ३, चेलिपुरा काझीवाडा २, सिव्हिल हॉस्पीटल परिसर १ तर ग्रामीण भागात हतनूर, कन्नड १, विवेकानंद कॉलनी, फुलंब्री ४ या भागातील कोरोनाबाधित आढळले.