coronavirus : कोरोनाच्या सावटामुळे पैठणचा नाथषष्ठी सोहळा रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 06:53 PM2020-03-10T18:53:11+5:302020-03-10T20:57:49+5:30

४२५ वर्षाच्या इतिहासात यंदा प्रथमच नाथषष्ठी रद्द झाली असून, पैठणची वारी करण्यासाठी शेकडो दिंड्यासह  पैठणच्या दिशेने आगेकूच करणाऱ्या वारकरी संप्रदायात मोठी नाराजी पसरली आहे.

coronavirus: Paithan Nathshathi ceremony canceled due to fear of Corona virus BKP | coronavirus : कोरोनाच्या सावटामुळे पैठणचा नाथषष्ठी सोहळा रद्द

coronavirus : कोरोनाच्या सावटामुळे पैठणचा नाथषष्ठी सोहळा रद्द

googlenewsNext

औरंगाबाद -  कोरोना व्हायरसची साथ पसरू नये म्हणून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ४३नुसार जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी नाथषष्ठी यात्रा स्थगित करण्याचे आदेश मंगळवारी दुपारी जारी केले. ४२५ वर्षाच्या इतिहासात यंदा प्रथमच नाथषष्ठी रद्द झाली असून, पैठणची वारी करण्यासाठी शेकडो दिंड्यासह  पैठणच्या दिशेने आगेकूच करणाऱ्या वारकरी संप्रदायात मोठी नाराजी पसरली आहे. यात्रेकडे येणाऱ्या जनसमुदायास प्रतिबंध करण्यात येणार असल्याने दिंड्यांना अर्ध्या रस्त्यातून हात जोडून माघारी फिरावे लागणार आहे.

नाथषष्ठी महोत्सवासाठी राज्याच्या विविध भागातून भाविक वारकरी मोठ्या संख्येने श्री क्षेत्र पैठण येथे येतात. कोरोना  आजाराची लागण होऊन जगभरात १०५,  देशात अंदाजे ३८१७  लोक दगावले आहेत, आतापर्यंत ११००२ पेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.  भारतात  ४३  जणांना याा आजाराची लागण झाल्याचे ( WHO ) जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारी वरून समोर आले आहे. आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाने सदर आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना 5 मार्च 2020 च्या मार्गदर्शिके मध्ये दिलेल्या आहेत. केंद्र शासनाचे आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या करोना व्हायरस प्रतिबंध आराखडा दिनांक 03 मार्च 2020 नुसार जिल्हाधिकारी हे प्रतिबंधक मोहीमेचे नोडल अधिकारी आहेत . आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी व संसर्ग रोखण्यासाठी सुरक्षित अंतर रहावे म्हणन गर्दी , यात्रा , मेळावे यावर प्रतिबंधक उपाययोजना करण्याचे सदर आराखडया मध्ये निर्देश दिले आहेत. 

पैठण , जिल्हा औरंगाबाद येथे श्री नाथ षष्ठी महोत्सव निमिताने आयोजित यात्रे मध्ये राज्यातील अनेक भागातून भाविक येतात आणि दिनांक 14  ते 16  मार्च 2020  दरम्यान अंदाजे 3 ते 5 लाख भाविक येतात. आणि कोरोना व्हायरसचा रुग्ण जर यात्रेमध्ये आला तर यामुळे कोरोना व्हायरस आजार ग्रस्तांच्या भर पडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. तसेच सदर आजारावर अदयापपर्यंत कुठलाही प्रतिबंधीत उपचार किंवा लस उपलब्ध नाही. 

नाथषष्ठी महोत्सव यात्रेमध्ये व जमणाऱ्या जनसमुदाया मध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊन या रोगाचा फैलाव होऊ नये म्हणून या ठिकाणी जात असलेल्या व्यक्तींना / भाविकांना उपरोक्त कालावधीत प्रतिबंध करणे प्रशासकीय दृष्टया अत्यंत आवश्यक असल्याने जिल्हयात कोरोना या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये तसेच जिवित हानी होऊ नये या दृष्टीने सुरक्षीततेची उपाययोजना म्हणून  जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी मंबई पोलीस कायदा 1951 चे कलम 43 अन्वये पैठण , ता . पैठण , जि . औरंगाबाद येथील एकनाथ - षष्टी निमित आयोजित यात्रेस विशेष उपाययोजना करण्याचे दृष्टीने स्थगिती दिली आहे .

Web Title: coronavirus: Paithan Nathshathi ceremony canceled due to fear of Corona virus BKP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.