coronavirus : कोरोना साखळी तोडण्यास पैठणकर एकवटले; 'जनता कर्फ्यूस' मिळाला अभूतपूर्व प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 09:48 PM2020-06-26T21:48:18+5:302020-06-26T21:48:52+5:30

पैठण शहरात एकाच कुटुंबात सात कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आल्यानंतर नगराध्यक्ष सुरज लोळगे यांनी तीन दिवशीय जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते.

coronavirus: Paithankar gathers to break the corona chain; 'Janata Curfew' received an unprecedented response | coronavirus : कोरोना साखळी तोडण्यास पैठणकर एकवटले; 'जनता कर्फ्यूस' मिळाला अभूतपूर्व प्रतिसाद

coronavirus : कोरोना साखळी तोडण्यास पैठणकर एकवटले; 'जनता कर्फ्यूस' मिळाला अभूतपूर्व प्रतिसाद

googlenewsNext

पैठण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे वा प्रशासनाचे कुठलेच आदेश नसताना जनतेने जनतेसाठी पुकारलेल्या
 ' जनता कर्फ्यूस ' आज पैठण शहरात मोठा प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे शहरातील दारू दुकानेही या जनता कर्फ्यूत बंद राहिल्याने कोरोना साखळी तोडण्यासाठी पैठण शहरात राबविलेला जनता कर्फ्यू हा मॉडेल पँटर्न आता समोर आला आहे. 

पैठण शहरात एकाच कुटुंबात सात कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आल्यानंतर नगराध्यक्ष सुरज लोळगे यांनी तीन दिवशीय जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. शहरातील सर्व व्यापारी बांधवांनी सहकार्य केल्याने पुकारण्यात आलेल्या जनता कर्फ्यूस शहरात मोठा प्रतिसाद लाभला. दरम्यान शहरात आज पुन्हा एका रूग्णाची वाढ झाल्याने शहरवासीयांची धाकधूक वाढली असून पुकारण्यात आलेल्या तीन दिवशीय जनता कर्फ्यूचे नागरिकांनी समर्थन केले आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाच्या रूग्ण संख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर  एका व्यापाऱ्याच्या कुटुंबातील सात सदस्य पॉझिटिव्ह आढळून आल्याने पैठण शहरात खळबळ उडाली होती. खबरदारीचा उपाय म्हणून नगराध्यक्ष सुरज लोळगे, मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी शहरातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी व लोकप्रतिनिधीची बैठक घेऊन शुक्रवार ते रविवार दि २६ ते २८ जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. या आवाहनास जनतेतून मोठा प्रतिसाद लाभला.
जनतेने स्वयंप्रेरणेने जनता कर्फ्यूस प्रतिसाद दिल्याने नगराध्यक्ष सुरज लोळगे,  तहसीलदार चंद्रकांत शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी गोरख भामरे, पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख आदी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कौतूक केले आहे.

आज एका रूग्णाची भर....
दरम्यान पैठण शहरात आज आणखी एका रूग्णाची भर पडली असून शहरातील एका खाजगी रूग्णालयातील परिचारकाचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. रूग्णालयातील या परिचारकाच्या संपर्कात आलेल्यांंचे स्वँब घेण्यात आले आहे. सदर रूग्ण हा शहरातील नारळा भागातील रहिवाशी असून शहरातील दारूसलाम व नारळा या दक्षिण व उत्तर टोकाच्या भागात रूग्ण आढळून आले आहेत. नगर परिषदेच्या वतीने हे परिसर निर्जंतुककरून सील करण्यात आले आहेत.

Web Title: coronavirus: Paithankar gathers to break the corona chain; 'Janata Curfew' received an unprecedented response

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.