CoronaVirus : सुखद ! किराडपुरा येथील कोरोनामुक्त युवकाला रुग्णालयातून सुटी; आतापर्यंत २४ रुग्ण झाले बरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2020 06:33 PM2020-05-01T18:33:45+5:302020-05-01T18:35:22+5:30
किराडपूरा येथील पाच रुग्ण आढळून आले होते आतापर्यंत चार रुग्ण कोरोनामुक्त झाले होते.आता शेवटचा रुग्ण सुद्धा करोना मुक्त झाल्याने सध्या तरी किराडपूरा कोरोनामुक्त आहे.
औरंगाबाद : किराडपुरा येथील 22 वर्षीय युवक कोरोनामुक्त झाल्याने त्याला शुक्रवारी दुपारी जिल्हा रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यामुळे कोरोना मुक्त झालेल्यांची संख्या २४ झाली आहे. तर यापूर्वी कोरोनामुक्त झालेला एक वृद्ध पुन्हा कोरोना बाधित झाल्याने जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे.
किराडपूरा येथील पाच रुग्ण आढळून आले होते आतापर्यंत चार रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. आता शेवटचा रुग्णसुद्धा कोरोनामुक्त झाल्याने सध्या तरी किराडपूरा कोरोनामुक्त असल्याची परिस्थिती आहे. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुंदर कुलकर्णी यांनी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाला डिस्चार्ज कार्ड दिले. डॉ पद्मा बकाल, डॉ पद्मजा सराफ, डॉ कमलाकर मुदखेडकर आदींची उपस्थिती होती.
दरम्यान, शुक्रवारी दुपारपर्यंत कोरोना संशयित आणि संपर्कातील तब्बल 292 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मागील काही दिवसात शहरात मोठ्याप्रमाणात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने गुरुवारी रात्रीपर्यंत रुग्णसंख्या 177 वर गेली आहे. यात शुक्रवारी दुपारपर्यंत एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून न आल्याने शहारवासीयांना थोडा दिलासा मिळाला आहे. यात आणखी एक रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतला असल्याने एक सुखद धक्का शहरवासीयांना बसला आहे.दरम्यान, या रुग्णास १४ दिवस अलगिकरणात राहावे लागणार आहे त्याशिवाय आवश्यक सल्ला डॉ पद्मजा सराफ यांनी युवकाला दिला.