CoronaVirus :औरंगाबादमध्ये रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ; २३ पॉझिटिव्हसह रुग्णसंख्या २३९
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2020 09:05 AM2020-05-02T09:05:33+5:302020-05-02T09:06:02+5:30
यापूर्वी रुग्ण आढळलेल्या पाच भागातून आणखी रुग्ण आढळून आले आहेत
औरंगाबाद : शहरातील पाच भागात नवे 23 कोरोना बाधित आढळून आले आहे. त्यांचे अहवाल शनिवारी सकाळी मिळाले. त्यात नूर कॉलनी 5, बायजीपुरा 11, कैलाशनगर 3, समतानगर 2, जयभीमनगर येथील 2 बाधीत रुग्णाचा समावेश आहे. असे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले.
एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णासंख्या 239 वर पोहचली आहे. शुक्रवारी दिवसभरात 39 रुग्णाची वाढ झाली त्यामुळे आकडा 216 होता. 239 मधील 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर 24 जण कोरोनामुक्त झाले आहेत.