coronavirus : १० ऑगस्टपासून शहरात सेरो सर्वेक्षण; ४ हजार पेक्षा जास्त नमुनांची होणार तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 15:06 IST2020-08-07T15:03:22+5:302020-08-07T15:06:27+5:30
शहरात ४,२३५, तर ग्रामीण भागात १,८०० ते २ हजार नागरिकांच्या रक्ताचे नमुने घेण्यात येणार आहेत.

coronavirus : १० ऑगस्टपासून शहरात सेरो सर्वेक्षण; ४ हजार पेक्षा जास्त नमुनांची होणार तपासणी
औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भावाचा अटकाव करण्यासाठी आय.सी.एम.आर.नुसार सेरो सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्या सर्वेक्षणात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी गुरुवारी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात सेरो सर्वेक्षण नियोजनाबाबत बैठक झाली. यावेळी मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय, जि.प. सीईओ डॉ. मंगेश गोंदावले, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. ज्योती बजाज, डॉ. नीता पाडळकर, डब्ल्यूएचओचे प्रतिनिधी डॉ. मुजीब सय्यद, डॉ. उल्हास गंडाळ, डॉ. शोभा साळवे उपस्थित होते.
शहरात १० ते १८ आॅगस्टदरम्यान सर्वेक्षण होणार असून, १० ते १५ ऑगस्टदरम्यान औरंगाबाद शहर, तर १६ ते १८ ऑगस्टदरम्यान अनुक्रमे बजाज आणि वाळूज महानगरमध्ये सर्वेक्षण होईल. हे सर्वेक्षण दररोज २० ते २५ वॉर्डांमध्ये करण्यात येणार आहे. शहरात ४,२३५, तर ग्रामीण भागात १,८०० ते २ हजार नागरिकांच्या रक्ताचे नमुने घेण्यात येणार आहेत.