CoronaVirus : धक्कादायक ! औरंगाबादेत कोरोनाचा १२ वा बळी, ९५ वर्षीय वृद्धेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 11:44 AM2020-05-07T11:44:18+5:302020-05-07T11:44:41+5:30

औरंगाबादेत कोरोनाबाधितांची संख्या आता ३७३ झाली आहे

CoronaVirus: Shocking! 12th death of corona in Aurangabad, 95-year-old women dies | CoronaVirus : धक्कादायक ! औरंगाबादेत कोरोनाचा १२ वा बळी, ९५ वर्षीय वृद्धेचा मृत्यू

CoronaVirus : धक्कादायक ! औरंगाबादेत कोरोनाचा १२ वा बळी, ९५ वर्षीय वृद्धेचा मृत्यू

googlenewsNext

औरंगाबाद : शहरात गुरुवारी कोरोनाचा १२ वा बळी गेला. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना आसेफिया कॉलनीतील येथील ९५ वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस.व्ही. कुलकर्णी यांनी दिली.

या रुग्णास कोरोनासह अन्य आजारही होते. जिल्हा रुग्णालयातील हा कोरोनाचा पहिला मृत्यू ठरला आहे. दरम्यान, गुरुवारी सकाळी १७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे औरंगाबादेत कोरोनाबाधितांची संख्या आता ३७३ झाली आहे. यात जयभीमनगर येथे २ , किलेअर्क येथे २, हक टॉवर रेलवेस्टशन रोड येथे ५ , पुंडलीकनगर येथे ५ आणि कटकट गेट येथे ३ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले आहे.

२ हॉटस्पॉटमध्ये रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ
घाटी परिसरातील जयभीमनगर आणि मुकुंदवाडीतील संजयनगर-रोहिदासनगर या दोन हॉटस्पॉटमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. जयभीमनगर येथील रुग्णसंख्या आता ६१ झाली आहे. तर संजयनगर-रोहिदासनगर येथील रुग्णसंख्या ७४ झाली आहे. शहरात सर्वाधिक रुग्णसंख्या या दोन हॉटस्पॉटमध्ये आहे.

५१ भागांत कोरोनाची लागण
आतापर्यंत शहरातील ४६ भागांत कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. बुधवारी त्यात ५ नव्या भागांची भर पडल्याने आता ही संख्या ५१ झाली आहे. यात ४० भागांतील रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर ११ भागांतील काही रुग्ण कोरोनामुक्त, तर काहींचा मृत्यू झालेला आहे.

Web Title: CoronaVirus: Shocking! 12th death of corona in Aurangabad, 95-year-old women dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.