CoronaVirus : धक्कादायक ! कोठडीत ठेवलेला आरोपी पॉझिटिव्ह; सिटी चौक ठाण्यातील २५ पोलीस क्वारंटाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 11:28 AM2020-04-29T11:28:52+5:302020-04-29T11:31:36+5:30
पोलिसांना १४ दिवस विलगीकरण कक्षात ठेवणार
औरंगाबाद : गुंगीच्या गोळ्या विक्री करणाऱ्या अटकेतील आरोपी चा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने सिटिचौक ठाण्यात खळबळ . २५ पोलिसांना कोरोंटाईल करण्यात येणार .
याविषयी प्राप्त माहिती अशी की , सिटी चौक पोलिसांनी चार दिवसापूर्वी चेलीपुऱा येथे एका घरावर धाड टाकून नशेखोराना गुंगी आणणाऱ्या औषधी गोळ्या विक्री करताना एका आरोपीला रंगेहाथ पकडले होते . त्यावेळी त्याच्याकडून औषधी गोळ्यांचा मोठा साठा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर आरोपीला दोन दिवस लॉक ॲप मध्ये ठेवले होते तेव्हा त्याच्यासोबत अन्य तीन आरोपी होते .
दरम्यान, न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी ठोठावली कारागृहात आता कोरोना तपासणी शिवाय आरोपीला घेत नाही . यामुळे चार आरोपींची दोन दिवसापूर्वी घाटी रुग्णालयात कोरोना तपासणी करण्यात आली . अहवाल येईलपर्यंत सर्व आरोपी घाटीतील एका वॉर्डात दाखल होते . चार पैकी चेलीपुरा येथील एका आरोपीचा अहवाल आज कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आला . यामुळे सिटिचौक पोलीस ठाण्यातील पोलिसात खळबळ उडाली. त्या आरोपीच्या संपर्कात आलेल्या आणि त्याच्यावर कारवाई करणाऱ्या फौजदारासह सुमारे २५ ते २६ पोलिसांची कोरोना तपासणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.
पोलिसांना १४ दिवस विलगीकरण कक्षात ठेवणार
याविषयी सिटिचौक ठाण्याचे निरीक्षक संभाजी पवार यांनी सागितले की , पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोना ची सर्व खबरदारी घेतली आहे . सर्व लोक मास्क लावून आणि सॅनिटायझर वापरून स्वच्छता बाळगतात . यामुळे काळजी करण्याचे कारण नाही आता त्यांचा अहवाल निगेटिव्ह काय येतो हे पाहणे आहे . शिवाय अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर ही त्यांना १४ दिवस विलगीकरण कक्षात ठेवले जाईल .