CoronaVirus : धक्कादायक ! कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढल्याने कसाबखेडा ग्रामस्थांवर बहिष्कार; इतर गावांनी संपर्क तोडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 05:05 PM2020-04-24T17:05:31+5:302020-04-24T17:09:56+5:30
औरंगाबादयेथून आलेली महिला गावात आल्यानंतर पॉझीटीव्ह निघाल्यानेकसाबखेडा ग्रामस्थांना वाईट अनूभवास सामोरे जावेे लागत आहे.
- सुनील घोडके
खुलताबाद : खुलताबाद तालुक्यातील कसाबखेडा गावात लेकीकडे आलेली महिला पॉझिटिव्ह निघाल्याने भीतीबरोबरच वाईट अनुभवाचा सामना करावा लागत आहे. कोरोनाच्या धास्तीने गावातील लोकांशी अनेकांनी संपर्क तोडला आहे. तर बाहेर गावच्या दुकानदारांनीसुद्धा दुकानात न येण्याचे निरोप दििलाव आहेत. ना गेल्या तीन दिवसापासून हिन वागणूक मिळत असून अनेक वाईट अनूभवास सामोरे जावे लागत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
कसाबखेडा येथे 17 एप्रिल रोजी औरंगाबाद येथील आसेफिया कॉलनीतील 65 वर्षीय महिला लेकीकडे आली होती. ग्रामस्थांनी तिची कोरोना तपासणी करावयास भाग पडल्याने 20 एप्रिल रोजी सदरील महिला पॉझीटीव्ह निघाल्याने तिच्या संपर्कात आलेल्या 13 जणांची नुकतीच तपासणी करून त्यांना होम क्वोरंटाईन करण्यात आले आहे.
दरम्यान, कसाबखेडा गावात कोरोना पॉझीटीव्ह रूग्ण आढळल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पंरतू या घटनेनंतर कसाबखेडा ग्रामस्थांशी अनेकांनी संपर्क तोडला आहे. येथील अनेक छोटे मोठे दुकानदार लासूर स्टेशन येथील व्यापा-यांकडून माल घेतात मात्र, त्यांना दुकानात येवू नका असा निरोप देण्यात आला आहे. त्याचबरोबर परिसरातील छोट्या गावचे नागरिकही दैनदिन खरेदीसाठी कसाबखेड्यात येत असत पंरतू त्यांनीही गावाकडे पाठ फिरविली आहे. कसाबखेडा गावच्या नागरिकांस कुणी जवळही येवू देत नसल्याने ग्रामस्थांना एकप्रकारे हीन दर्जाची वागणूक मिळत असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. या सर्व गोष्टींचा गावातील नागरीक व व्यापारी वर्ग यांना मोठी किंमत चुकवावी लागत आहे. जीवनमनावर विपरीत परिणाम झाला आहे.
येथे मोसंबी, चिंचेचे व इतर व्यापारी मोठ्या संख्येने असुन संबंधित गावात शेतकरी यांचेकडे जायचे असल्यास रस्त्या रस्त्यावर अडवणूक होऊन हिन वागणूक मिळत आहे. गावातील नागरिकांना अनेक वाईट अनुभव येत असून गावात निराशेचे वातावरण निर्माण झाल्याने गाव चिंताग्रस्त झाल्याचे चित्र आहे. संपर्कात आलेले सर्व नागरीक निगेटिव्ह असल्याने परिसरातील गावांनी कोणतीही शंका बाळगू नये अशी अपेक्षा कसाबखेडा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. दरम्यान,पॉझिटिव्ह महिलेच्या संपर्कात आलेल्या सर्व नागरिकांची तपासणी निगेटिव्ह आली आहे.त्यांची 25 एप्रिल रोजी दुसरी तपासणी करण्यात येणार आहे.
प्रशासनाने दखल घ्यावी
याबाबत गावचे सरपंच नईम महेबूब पटेल म्हणाले की, कसाबखेडा गावातील चार दिवसाच्या घटनेनंतर घबराटीचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेे गावात चिंच व मोसंबीचे व्यापारी मोठ्या प्रमाणावर असून त्यांना चिंच व मोसंबी खरेदीसाठी बाहेर गावचे लोक रस्त्यावरच अडवूण माघारी पाठवत आहे. अनेकांनी गावाच्या लोकांशी संपर्क तोडला आहे. लासूर स्टेशन बाजारपेठेत ही व्यापारी व नागरिकांना अपमानास्पद वागणूक दिली आहे. याबाबत प्रशासनाने दखल घ्यावी.
नागरिकांना हीन वागणूक मिळतं आहे
ग्रामपंचायतीचे सदस्य सुनील औटे पाटील म्हणाले की, सदरील महिला कसाबखेडा गावची नसून ती औरंगाबाद येथील आहे. ग्रामस्थांनीच तिला गावात आल्याबरोबर तपासणीसाठी पाठविले. पंरतू या घटनेनंतर गावातील प्रत्येक नागरिकांकडे बाहेरचे लोक संशयाने पाहत असून हिनदर्जाची वागणूक मिळत आहे. याबाबत सरकारने काही तरी केले पाहिजे कसाबखेडा गाव भारतातीलच असून आम्ही काही दुस-या देशातील नाही.