coronavirus : औरंगाबादेत कोरोनाचा पंधरावा बळी; पंधरा तासात दोन रुग्णांचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 07:42 PM2020-05-11T19:42:14+5:302020-05-11T19:42:33+5:30

पुंडलीकनगरातील 58 वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू 

coronavirus: shocking! Fifteenth death of Corona in Aurangabad; Two patients died in fifteen hours | coronavirus : औरंगाबादेत कोरोनाचा पंधरावा बळी; पंधरा तासात दोन रुग्णांचा मृत्यू 

coronavirus : औरंगाबादेत कोरोनाचा पंधरावा बळी; पंधरा तासात दोन रुग्णांचा मृत्यू 

googlenewsNext
ठळक मुद्देचार दिवसात २४१ रुग्णांची भर

औरंगाबाद ः पुंडलीकनगर येथील 58 वर्षीय व्यक्तीचा सोमवारी दुपारी साडेचार वाजता मृत्यू झाला. गेल्या पंधरा तासातील हा दुसरा मृत्यू असून शहरातील हा 15 वा मृत्यू आहे. अशी माहीती डाॅ. अरविंद गायकवाड यांनी दिली. 

रविवारी जिल्हा रुग्णालयातून त्यांना घाटीत पहाटे अडीच वाजता हलवण्यात आले होते. मेंदु्चा टिबीसह त्यांना इपिलीप्सी व फुफ्फुसाचा एक भाग शस्त्रक्रीयेने काढण्यात आलेला होता. त्यांना भरती केल्यापासून व्हेटीलेटरवर ठेवण्यात आले होते. तर झटके आल्यामुळे त्यांचा साडेचार वाजता मृत्यू झाल्याचे डॉ. मिनाक्षी भट्टाचार्य यांनी माहिती दिली.

दरम्यान, जिल्ह्यात रविवारी दिवसभरात ५० रुग्ण वाढल्यावर सोमवारी सकाळीच तब्बल ६१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ६१९ झाली आहे. आज वाढलेल्या रुग्णात रामनगर 22, एस आरपीएफ जवान १, सदानंदनगर 8, किलेअर्क ८, न्यायनगर २, दत्त नगर कैलास नगर ५ , भवानी नगर जुना मोंढा 3, पुंडलिक नगर गल्ली 1 , एन 4 सिडको, बायजीपुरा,  संजयनगर, कैलासनगर, बीड बायपास, कोतवालपुरा, सातारा गाव  येथील प्रत्येकी एक व फुलशिवरा गंगापूर येथील 4 रुग्णांचा समावेश आहे.

चार दिवसात २४१ रुग्णांची भर
शहरात रविवारी सकाळच्या सत्रात सात भागातील ३७ रुग्ण आढळल्यावर दुपारच्या सत्रात १३ रुग्णांची भर पडत दिवसभरात रुग्णसंख्या ५० तर एकुण बाधितांची संख्या ५५८ झाली होती. मागील चार दिवसात शहरात शुक्रवारी १०० , शनिवारी ३० आणि रविवारी ५० , सोमवारी सकाळी ६१ अशा तब्बल २४१ रुग्णांची भर पडल्याने शहरवासीयांना मोठा धक्का बसला आहे.

Web Title: coronavirus: shocking! Fifteenth death of Corona in Aurangabad; Two patients died in fifteen hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.