coronavirus : धक्कादायक ! घाटी रुग्णालयातील कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 04:38 PM2020-06-20T16:38:23+5:302020-06-20T16:39:01+5:30
शनिवारी दुपारी झाला मृत्यू
औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या ४७ वर्षीय जमादाराचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी पुढे आली. या मृत्यूमुळे जिल्हातील आतापर्यंतचा कोरोना बळींची आकडा १८० झाला आहे.
बेगमपुऱ्यातील रहिवाशी असलेल्या या कर्मचाऱ्याला ४ जून रोजी घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. ५ जून रोजी त्यांना कोरोना असल्याचे निदान झाले. उच्चरक्तदाबाचाही त्रास होता. गेल्या दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती अधिकच बिघडली होती. शनिवारी दुपारी २. १० वाजता त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याच्या मृत्यूमुळे घाटीतील इतर कर्मचाऱ्यांमधून हळहळ व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात १०२ कोरोनाबाधितांची वाढ
शनिवारी सकाळी जिल्ह्यात १०२ कोरोना रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३३४० झाली आहे.
या भागात आढळले बाधित :
नवजीवन कॉलनी १, गरम पाणी १, पडेगाव १, जाधववाडी २, राजाबाजार १ एन नऊ हडको १, ठाकरे नगर १, बजाजनगर १, एन सहा १, शिवाजीनगर १, नागेश्वरवाडी ३, शिवशंकर कॉलनी २, गजानननगर २, छत्रपतीनगर १, दर्गा रोड १, एकतानगर, हर्सुल १, हनुमानगर १, सुरेवाडी ३, टीव्ही सेंटर १, एन आठ सिडको १, श्रद्धा कॉलनी ४, एन सहा, सिंहगड कॉलनी १ आयोध्यानगर १, बायजीपुरा ३, कोतवालपुरा १, नारळीबाग १, अंबिकानगर, मुकुंदवाडी ४, गल्ली नंबर दोन पुंडलिकनगर १, समता नगर-१, सिंधी कॉलनी १, बजाजनगर १ जुना मोंढा, भवानीनगर १, जयसिंगपुरा २, , सिडको एन अकरा १, नेहरूनगर, कटकट गेट १, न्यू हनुमाननगर १, विजय नगर, नक्षत्रवाडी १, भाग्य नगर ४, शिवाजी नगर १, पदमपुरा १, उत्तमनगर २, खोकडपुरा २, टिळकनगर १, पिसादेवी १, बीड बायपास २, सखी नगर ३, जिल्हा परिषद परिसर १, सारा गौरव बजाजनगर ३, सिद्धी विनायक मंदिराजवळ बजाज नगर ६, पंचमुखी हनुमान मंदिराजवळ बजाज नगर ४, जय भवानी चौक, बजाज नगर १, चिंचवन कॉलनी, बजाज नगर ३, दीपज्योती हाऊसिंग सोसायटी बजाज नगर १, दत्तकृपा कॉलनी जवळ बजाज नगर १, देवगिरी मार्केट जवळ बजाजनगर २, सह्याद्री हाऊसिंग सोसायटी, बजाजनगर १, मांडकी १, पळशी ५, जय हिंद नगरी, पिसादेवी १, कन्नड १, मातोश्रीनगर १ या भागातील कोरोना बाधित आहेत. या मध्ये ४७ स्त्री व ५५ पुरुष आहेत.