धक्कादायक ! रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांची महिला डॉक्टरांना मारहाण; रुग्णालयात तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 01:31 PM2020-08-20T13:31:54+5:302020-08-20T16:41:21+5:30

एमजीएम रुग्णालयात कोरोना संशयीत रुग्णाचा उपचार सुरू असताना झाला मृत्यू

coronavirus : Shocking! Relatives beat female doctor after patient's death; Hospital vandalism | धक्कादायक ! रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांची महिला डॉक्टरांना मारहाण; रुग्णालयात तोडफोड

धक्कादायक ! रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांची महिला डॉक्टरांना मारहाण; रुग्णालयात तोडफोड

googlenewsNext
ठळक मुद्देनातेवाईकांनी रुग्णालयातील साहित्यांचीही तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल

औरंगाबाद : शहरातील एमजीएम रुग्णालयात एका कोरोना संशयित रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी महिला डॉक्टरला मारहाण केली. तसेच कोविड रुग्णालयातील आयसीयुमध्ये तोडफोड केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री घडली.

तिसगाव येथील एका ७९ वर्षीय कोरोना संशयित रुग्णावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी रात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रात्री ११.३० वाजेच्या सुमारास याविषयी डॉक्टरांकडून नातेवाईकांना माहिती दिली जात होती. यावेळी नातेवाईकांनी अचानक आरडाओरडा करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. या दरम्यान त्यांनी तेथील महिला डॉक्टरांना मारहाण करत आयसीयूमधील साहित्यांचीही तोडफोड केली. तसेच आयसीयूतील डॉक्टर सागर आणि नर्स पूजा गायकवाड यांनाही अरेरावी करीत धक्काबुक्की करण्यात आली.

याप्रकरणी एमजीएम प्रशासनाच्या तक्रारीवरून आरोपी विजेंद्र प्रभूलाल जैस्वाल आणि जितेंद्र प्रभूलाल जैस्वाल विरूध्द सिडको ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तोडफोडीत आयसीयूचे सुमारे ५० हजाराचे नुकसान झाल्याचे एमजीएम प्रशासनाने पोलीस तक्रारीत नमूद केले आहे.

Web Title: coronavirus : Shocking! Relatives beat female doctor after patient's death; Hospital vandalism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.