coronavirus : सिल्लोडकर चिंतेत ; कोरोनाबाधित गर्भवती महिला शहरातील रुग्णालयात होती दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 07:12 PM2020-05-14T19:12:05+5:302020-05-14T19:14:04+5:30

ळे रुग्णालय, सोनोग्राफी केंद्रातील कर्मचाऱ्यांसह १२७ नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात आले

coronavirus: Sillodkar anxious; Corona-infected pregnant women were admitted to the city for treatment | coronavirus : सिल्लोडकर चिंतेत ; कोरोनाबाधित गर्भवती महिला शहरातील रुग्णालयात होती दाखल

coronavirus : सिल्लोडकर चिंतेत ; कोरोनाबाधित गर्भवती महिला शहरातील रुग्णालयात होती दाखल

googlenewsNext
ठळक मुद्देऔरंगाबादमधील शासकीय रुग्णालय घाटी येथे तिची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

 सिल्लोड: भोकरदन तालुक्यातील अनवा येथील कोरोना पॉझिटिव्ह अल्पवयीन गर्भवती विवाहिता उपचारासाठी शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल झाली होती. त्यानंतर ति सोनोग्राफी केंद्रावर तपासणीसाठी गेल्याची माहिती पुढे आली आहे. यामुळे रुग्णालय, सोनोग्राफी केंद्रातील कर्मचाऱ्यांसह १२७ नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. 

कोरोनाबाधित अल्पवयीन गर्भवती महिला मंगळवारी (दि.१२ ) येथील रुग्णालयात उपचारासाठी आली होती. सोनोग्राफी केल्यानंतर डॉक्टरांनि डॉक्टरानी तिला लागलीच औरंगाबाद येथे पुढील उपचारासाठी पाठविले. येथे शासकीय रुग्णालय घाटी येथे तिची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. सिल्लोड येथे रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या 33 महिला,  रुग्णालयातील 13 कर्मचारी, सोनोग्राफी केंद्रात आलेल्या 70 महिला व 4 पुरुष, केंद्राचे 5 कर्मचारी, रुग्णवाहिकेचे २ चालक असे एकूण 127 जण महिलेच्या संपर्कात आल्याचे समोर आले आहे.

तीन दिवस सिल्लोड तालुका बंद
अत्यावश्यक सेवा वगळता पुढील तीन दिवस सिल्लोड तालुक्यात जनता कर्फ्यु राहणार आहे. नागरिकांनी विनाकारण फिरू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल. 
- सुदर्शन मुंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी 

प्रशासनाने खबरदारी घेतली
प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. तालुक्यातील नागरिकांनी काळजी घ्यावी, घरीच थांबावे. सतर्कता बाळगावी.
- ब्रिजेश पाटील, उपविभागीय अधिकारी 

Web Title: coronavirus: Sillodkar anxious; Corona-infected pregnant women were admitted to the city for treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.