coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात पोलीस कर्मचाऱ्यासह सहा बाधितांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2020 04:51 PM2020-08-02T16:51:53+5:302020-08-02T16:54:42+5:30

रविवारी कोरोनाबाधित ७६ रुग्णांची वाढ, ६ मृत्यू

coronavirus: Six corona patients death, including a policeman in Aurangabad district | coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात पोलीस कर्मचाऱ्यासह सहा बाधितांचा मृत्यू

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात पोलीस कर्मचाऱ्यासह सहा बाधितांचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देखाजगी रुग्णालयात ५१ वर्षीय पोलीस हवालदाराचा कोरोनामुळे मृत्यूआतापर्यंत ४८३ जणांचा मृत्यू झाला आहे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १४ हजार ४०३ वर

औरंगाबाद : जिल्ह्यात ७६ रुग्णांचे अहवाल रविवारी (दि. २) सकाळी पॉझिटिव्ह आले. तर पोलीस कर्मचाऱ्यासह जिल्ह्यातील ५ तर परभणी जिल्ह्यातील एका बाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १४ हजार ४०३ एवढी झाली आहे. त्यापैकी १० हजार ६०१ बरे झाले तर ४८३ जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या ३३१९ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

पोलीस हवालदारासह ६ बाधितांचा मृत्यू
खाजगी रुग्णालयात जिन्सी पोलीस ठाण्यात कार्यरत ५१ वर्षीय पोलीस हवालदाराचा कोरोनामुळे मृत्यू झाला. २० जुलै पासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. रविवारी सकाळी साडेआठ वाजता त्यांचा मृत्यू झाला. शहर पोलीस दलातील कोरोनामुळे झालेला हा दुसरा बळी आहे. महिनाभरापूर्वी एका पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पोलीस दलातुन हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, आई, वडील आणि भाऊ भावजय असा परिवार आहे.

तर जिल्ह्यातील चार जणांसह खडकपुरा गंगाखेड येथील कोरोनाबाधितांचा घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. पैठण तालुक्यातील नवगाव येथील ६४ वर्षीय पुरुष, रेल्वेस्टेशन परिसरातील राहुलनगर येथील ५५ वर्षीय महिला, बायजीपुरा इंदिरानगर येथील ५५ वर्षीय महिला, जय भवानी नगर येथील ४० वर्षीय पुरुष, खडकपुरा येथील ५३ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृतात समावेश आहे. 

मनपा हद्दीत ३३ रुग्ण 
एन बारा, स्वामी विवेकानंद नगर, हडको 3, विनायक नगर १, कोकणवाडी १, जालान नगर १, मुकुंदवाडी ३, शिल्प नगर २, रमा नगर ३, व्यंकटेश नगर १, उत्तरानगरी २, देवळाई रोड १, बालाजी नगर १, पुंडलिक नगर ३, शिवशंकर कॉलनी ३, ठाकरे नगर २, मिलिट्री हॉस्पीटल १, एमएसएम कॉलेज परिसर, खडकेश्वर १, गुलमोहर कॉलनी, एन सहा सिडको १, हडको १, व्हिनस सो., पीडब्ल्यूडी कॉलनी, बीड बायपास १, अन्य  १.

ग्रामीण भागात ४४ रुग्ण
मुधळवाडी, पैठण २, गुरूदेव सो., बजाज नगर ३, साई कन्सस्ट्रक्शन, रांजणगाव २, नील विठ्ठल मंदिर परिसर, बोयगाव १, संघर्ष नगर, घाणेगाव १, बोरगाववाडी, सिल्लोड १, गांधी चौक, अजिंठा ४, काजी मोहल्ला, कन्नड १, गोळेगाव, खुलताबाद २, पवार वसती, बाबरा, फुलंब्री ५, गंगापूर १३, बगडी, गंगापूर १, काळे कॉलनी, सिल्लोड १, आनंद पार्क, सिल्लोड ३, स्नेह नगर, सिल्लोड १, शास्त्री नगर, सिल्लोड १.

Web Title: coronavirus: Six corona patients death, including a policeman in Aurangabad district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.