CoronaVirus : कोरोना विरुद्धच्या युद्धाला बळ; नंदुरबारला प्रतिनियुक्तीवर पाठवलेले 16 डाॅक्टर परतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 05:17 PM2020-04-11T17:17:14+5:302020-04-11T17:17:55+5:30
घाटीत देणार मुळ पदस्थापनेवर सेवा
औरंगाबाद ः कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी घाटीचे नंदुरबार येथे प्रतिनीयुक्तीवर पाठवलेल्या 16 डाॅक्टरांना शनिवारी (दि. 11) कार्यमुक्त करण्यात आले. त्यामुळे त्या डाॅक्टरांना घाटीत मुळ पदस्थापनेवर सेवा देता येणार आहे. त्यातील दहा जण चिकित्सालयीन तर सहा जण अचिकित्सालयीन अध्यापक आहेत. अशी माहीती नंदुरबार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डाॅ. शिवाजी सुक्रे यांनी दिली.
नंदुरबार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या निरीक्षणासाठी घाटीच्या 23 वैद्यकीय अध्यापकांना, कर्मचार्यांना प्रतिनीयुक्तीवर पाठवण्यात आले होते. कोरनाचे सावट गडद होत असल्याने वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालयाचे संचालक डाॅ. तात्याराव लहाने यांनी या प्राध्यापकांना कोरोनाचा धोका संपेपर्यंत कार्यमुक्त करण्याच्या सुचना नंदुरबार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्याा अधिष्ठातांना दिल्या.
त्यानुसार पहिल्या टप्प्यात सात तर शनिवारी डाॅ. शिवाजी सुक्रे, डाॅ. वर्षा देशमुख, डाॅ. प्रविण ठाकरे, डाॅ. मुक्तदिर अन्सारी, डाॅ. अमोल सुर्यवंशी, डाॅ. प्रशांत पाचोरे, डाॅ. अमरनाथ अवरगांवकर, डाॅ. सय्यद रिझवी, डाॅ. धनजकर, डाॅ. विकास गांगुर्डे, डाॅ. महोम्मद लईक, डाॅ. घोडके, डाॅ. रविराज नाईक, डाॅ. संदिप बोकनकर, डाॅ. दिपक कावळे, डाॅ. अब्दुल राफे यांना कार्यमुक्त करण्यात आले. सोमवारपासून हे सर्वजण घाटीत कार्यरत होतील.