coronavirus : कोरोनाबाधित दोघांचा मृत्यू; एकूण कोरोना बळींची संख्या ४६४ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 02:08 PM2020-07-29T14:08:32+5:302020-07-29T14:10:48+5:30
जिल्ह्यात आतापर्यंत १३, ४४० कोरोनाबाधित आढळले आहेत.
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना २ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशाशनाने दिली. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यू पावलेल्या एकूण रुग्णांची संख्या ४६४ झाली.
टीव्ही सेंटर, हडको येथील ७१ वर्षीय पुरुष आणि छावणी-गवळीपुरा येथील ७० वर्षीय महिलेचा बुधवारी सकाळी घाटी उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या सोबतच बुधवारी सकाळी खासगी रुग्णालयांत सिल्लोड तालुक्यातील समतानगर, शिक्षक कॉलनीतील ५८ वर्षीय पुरूष, औरंगाबाद शहरातील कैसर कॉलनीतील ५९ वर्षीय पुरूष, रोशन गेट येथील ७० वर्षीय पुरूष आणि फाजलपु-यातील ४६ वर्षीय पुरूष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे दुपारपर्यंत एकूण ६ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
जिल्ह्यात ७१ रुग्णांची वाढ
जिल्ह्यातील ७१ रुग्णांचे अहवाल बुधवारी सकाळी पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यात आतापर्यंत १३, ४४० कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी ९, ३३८ रूग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत एकूण ४६४ जणांचा मृत्यू झाला. आजघडीला ३६४० जणांवर उपचार सुरु आहेत.
ग्रामीण भागातील रूग्ण
पाचोड,पैठण २, नूतन कॉलनी, गंगापूर १, औरंगाबाद ९, फुलंब्री १, सिल्लोड २, वैजापूर १५, पैठण ७, सोयगाव ४
मनपा हद्दीतील रूग्ण
बैजिलालनगर १, सिडको परिसर १, मुकुंदवाडी १, जवाहर कॉलनी १, पंचशीलनगर २, रोशन सो., गारखेडा १, उल्कानगरी ४, एन सहा सिडको ६, संघर्षनगर, मुकुंदवाडी ३, सिद्धार्थ नगर ५, गवळीपुरा १, रामनगर १, एन सात, अयोध्यानगर १, गारखेडा परिसर २