CoronaVirus : औरंगाबादमध्ये आणखी दोघे पॉझिटिव्ह; रुग्ण संख्या ३८ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 12:11 PM2020-04-22T12:11:26+5:302020-04-22T12:11:48+5:30

शहरातील समतानगरमध्ये आणखी दोघे पॉझिटिव्ह

CoronaVirus: Two more positive in Aurangabad; 38 patients in city | CoronaVirus : औरंगाबादमध्ये आणखी दोघे पॉझिटिव्ह; रुग्ण संख्या ३८ वर

CoronaVirus : औरंगाबादमध्ये आणखी दोघे पॉझिटिव्ह; रुग्ण संख्या ३८ वर

googlenewsNext

औरंगाबाद : शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या बुधवारी ३६ वरून ३८ वर गेली. समतानगर येथील आणखी दोघांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या भागातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ५ वर गेली आहे.

समतानगर येथे एका ५१ वर्षीय आणि एका २५ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी दिली. मंगळवारी समतानगर येथील १८ वर्षीय आणि २० वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. दोन दिवसांपूर्वी समतानगर येथील राहणाऱ्या ३८ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले होते. त्याच्या संपर्कातील लोकांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर चार रुग्ण समोर आले. दरम्यान, समतानगर येथे आणखी दोन रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३८ वर गेली आहे.

Web Title: CoronaVirus: Two more positive in Aurangabad; 38 patients in city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.