coronavirus : परवानगी अभावी गंभीर रुग्णांना प्लाझ्मा थेरपीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 07:16 PM2020-07-24T19:16:23+5:302020-07-24T19:17:23+5:30

कोरोना रुग्णांच्या उपचारात ‘प्लाझ्मा थेरपी’ने एक नवीन उमेद जागविली आहे.

coronavirus: waiting for plasma therapy in critically ill patients without permission | coronavirus : परवानगी अभावी गंभीर रुग्णांना प्लाझ्मा थेरपीची प्रतीक्षा

coronavirus : परवानगी अभावी गंभीर रुग्णांना प्लाझ्मा थेरपीची प्रतीक्षा

googlenewsNext
ठळक मुद्दे५० लिटर प्लाझ्मा संकलनाचे लक्ष्य परवानगी मिळताच प्रत्यक्ष रुग्णांना प्लाझ्मा देण्यास सुरुवात

औरंगाबाद : घाटीत कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार केले जाणार आहेत. यासाठी अद्यापही  ‘आयसीएमआर’ आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या (डीएमईआर)  परवानगीची प्रतीक्षा आहे. ही परवानगी मिळताच प्रत्यक्ष रुग्णांना प्लाझ्मा देण्यास सुरुवात होणार आहे.

कोरोना रुग्णांच्या उपचारात ‘प्लाझ्मा थेरपी’ने एक नवीन उमेद जागविली आहे. त्यात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचे प्लाझ्मा गंभीर रुग्णांना देण्यात येतात. त्यासाठी कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचे प्लाझ्मा संकलित केले जात आहेत. घाटीत किमान ५० लिटर प्लाझ्मा संकलनाचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. कोरोनातून बरे झालेल्या एका रुग्णाकडून ४०० मिलिलिटर प्लाझ्मा संकलन करता येते. यानुसार १२५ दात्यांकडून याचे संकलन केले जाणार आहे. त्यासाठी १३६ दात्यांबरोबर घाटीने संपर्क केला आहे. आतापर्यंत ७ दात्यांनी  प्लाझ्मा दान केले आहे. यातून २ लिटर ८०० मिलिलिटर प्लाझ्मा संकलन झाले आहे.
गंभीर रुग्णांना २०० मिलिलिटर कॉन्व्हॅलेसेंट प्लाझ्माचे २४ तासांच्या अंतरात दोन डोस दिले जातील. कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांच्या प्लाझ्मामध्ये कोरोना विषाणूविरुद्ध अँटिबॉडी असतात. ज्यामुळे संक्रमणाविरुद्ध प्लाझ्मा मिळालेल्या गंभीर रुग्णांना आजाराशी लढण्यास मदत होते. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्लाझ्मा थेरपीसाठी प्रयत्न सुरू आहेत. १५ आॅगस्टपर्यंत प्लाझ्मा देण्यास सुरुवात होईल.
 

Web Title: coronavirus: waiting for plasma therapy in critically ill patients without permission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.