क्वारंटाईनचा शिक्का दिसताच कामगारांना उतरविले रेल्वेतून, अखेर चूक लक्षात येताच केले रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 01:11 PM2020-05-23T13:11:01+5:302020-05-23T13:14:17+5:30

औरंगाबादहून शनिवारी मुजफरपूरला रेल्वे रवाना झाली.

coronavirus: Workers get off train as soon as they see quarantine stamp; at last truth knows and allows to travel | क्वारंटाईनचा शिक्का दिसताच कामगारांना उतरविले रेल्वेतून, अखेर चूक लक्षात येताच केले रवाना

क्वारंटाईनचा शिक्का दिसताच कामगारांना उतरविले रेल्वेतून, अखेर चूक लक्षात येताच केले रवाना

googlenewsNext

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : मुजफरपूरला जाणाऱ्या रेल्वेत क्वारंटाईन केलेले कामगार, मजूर बसल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी समोर आले. ही बाब लक्षात येताच दोन बोगीत बसलेल्या कामगारांना उतरविण्यात आले. परंतु या कामगारांकडे वैद्यकीय प्रमाणपत्र असून, चुकून शिक्का मारल्याचे लक्षात येताच त्यांना पुन्हा रेल्वेत बसवण्यात आले.

औरंगाबादहून शनिवारी मुजफरपूरला रेल्वे रवाना झाली. यातून मराठवाडयातून कामगार रवाना झाले. लातूरवरून आलेले कामगार, त्यांचे कुटूंबीय दोन बोगीत बसले होते. यावेळी त्यांचा हातावर शिक्का काही रेल्वे कर्मचाऱ्यांचा निदर्शनास आले. त्यामुळे त्यांना तात्काळ रेल्वेतून खाली उतरविण्यात आले. त्यांना रेल्वेस्टेशनच्या एका बाजूला बसविण्यात आले. यासंदर्भात लातूर जिल्हा प्रशासनासोबत संपर्क करण्यात आला. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याची पडताळणी केली. तेव्हा डॉक्टरांकडून चुकून शिक्का मारण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांना अखेर पाठविण्यात आले.

Web Title: coronavirus: Workers get off train as soon as they see quarantine stamp; at last truth knows and allows to travel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.