CoronaVirus : चिंताजनक ! औरंगाबादमध्ये आणखी २४ पॉझिटिव्हसह रुग्णसंख्या ६५१ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 08:56 AM2020-05-12T08:56:39+5:302020-05-12T08:57:04+5:30
शहरात कोरोनामुक्त आणि नव्या भागातही संक्रमण वाढत आहे. पाच दिवसात तब्बल २७३ रुग्णांची भर पडल्याने शहरावसीयांना मोठा धक्का बसला आहे.
औरंगाबाद : मंगळवारी सकाळच्या सत्रात २४ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा ६५१ झाला आहे,अशी माहिती जिल्हा रुग्णालयाचे डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी दिली. शहरात कोरोनामुक्त आणि नव्या भागातही संक्रमण वाढत आहे. पाच दिवसात तब्बल २७३ रुग्णांची भर पडल्याने शहरावसीयांना मोठा धक्का बसला आहे.
मंगळवारी सकाळी पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांत नऊ महिला 16 पुरुषांचा समावेश आहे. यात पुंडलिक नगर 2 येथील, एन 8 येथील 1, रामनगर 1 , संजयनगर 5, प्रकाशनगर 1, एन 7 येथील 4, रोशनगेट, गांधीनगर 1, दत्त नगर 1, भडकलगेट 1, चिकलठाणा 1, शहानुरमियाँ दर्गा येथील 1, अन्य दोन ठिकाणचे दोन आणि महापालिकेच्या एका कर्मचाऱ्याला बाधा झाली असल्याचे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले
पाच दिवसात २७३बाधितांची भर
दरम्यान, शहरात रविवारी सकाळच्या सत्रात सात भागातील ३७ रुग्ण आढळल्यावर दुपारच्या सत्रात १३ रुग्णांची भर पडत दिवसभरात रुग्णसंख्या ५० तर एकुण बाधितांची संख्या ५५८ झाली होती. मागील चार दिवसात शहरात शुक्रवारी १००, शनिवारी ३० आणि रविवारी ५०, सोमवारी ६९, मंगळवारी २४ अशा तब्बल २७३ रुग्णांची भर पडल्याने शहरवासीयांना मोठा धक्का बसला आहे. यात नव्या भागांतील तसेच कोरोनामुक्त भागांतही संक्रमण होत असल्याने चिंतेत भर पडली असुन आरोग्य विभागाकडून काॅन्टक्ट ट्रेसिंगवर भर देण्यत येत आहे. जिल्हा रुग्णालयात भरती रुग्णांना लक्षणे नसल्यास त्यांना तपासण्या करुन स्थिर झाल्यावर पाचव्या दिवशी महापालिकेच्या कोव्हीड केअर सेंटरमध्ये हलवण्यात येत आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात डिस्चार्जचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढेल असे डाॅ. कुलकर्णी यांनी सांगितले.
सोमवारी सोळा भागात आढळले रुग्ण
सातारा गाव १, कोतवाल पुरा या नव्या भागात १, तर कोरोनामुक्त झालेल्या सिडको एन-4 सिडकोमध्ये १ रुग्ण आढळून आला. न्याय नगर २, संजय नगर १, सदानंद नगर, सातारा परिसर ८, बीड बायपास रोड १, भवानी नगर , जुना मोंढा ५, पुंडलिक नगर, गल्ली क्रमांक सहा १, दत्त नगर-कैलास नगर ५, कैलास नगर १, बायजीपुरा १, राम नगर २२, किल्ले अर्क ८, एसआरपीएफ-सातारा परिसर १, गंगापूर तालुक्यातील फुलशिवरा ५ रुग्णांचे अहवाल पाॅझीटीव्ह आले. या रुग्णांमध्ये ३६ पुरूष आणि २६ महिलांचा समावेश आहे.