CoronaVirus : चिंताजनक ! औरंगाबादमध्ये कोरोनाचा तिसरा बळी; ६५ वर्षीय वृद्ध महिलेचा घाटीत मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 09:25 AM2020-04-18T09:25:34+5:302020-04-18T09:29:27+5:30

बिस्मिल्ला कॉलनी येथील रहिवासी असलेल्या वृद्धा सुरुवातीला सेन्ट्रल नाका परिसरातील खाजगी रुग्णालयात भरती होत्या.

CoronaVirus: Worrying! Corona's third death in Aurangabad; 65- year-old woman dead | CoronaVirus : चिंताजनक ! औरंगाबादमध्ये कोरोनाचा तिसरा बळी; ६५ वर्षीय वृद्ध महिलेचा घाटीत मृत्यू

CoronaVirus : चिंताजनक ! औरंगाबादमध्ये कोरोनाचा तिसरा बळी; ६५ वर्षीय वृद्ध महिलेचा घाटीत मृत्यू

googlenewsNext

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 65 वर्षीय कोरोना बाधित महिलेचा शनिवारी सकाळी 6.50 ला मृत्यू झाला. अशी माहिती अधिष्ठाता डॉ कानन येळीकर यांनी दिली. 

बिस्मिल्ला कॉलनी येथील रहिवासी असलेल्या वृद्धा सुरुवातीला सेन्ट्रल नाका परिसरातील खाजगी रुग्णालयात भरती होत्या. त्यानंतर त्यांना घाटी रुग्णालयात संदर्भित करण्यात आले होते. 13 एप्रिल ला घाटी रुग्णालयाचा मेडिसीन विभागात स्वतंत्र संशयित कोरोना रुग्णांसाठीच्या अलगिकरण कक्षात उपचार सुरू असताना त्यांचा स्वब घेण्यात आला होता. 16 एप्रिलला त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना कोरोना वार्डात हलवण्यात आले होते. त्यावेळी मधुमेह रक्तदाब व किडनीचा आजाराने ग्रासल्यामुळे तब्बेत गंभीर असल्याचे यावेळी डॉ अरविंद गायकवाड यांनी कळवले होते. कोरोना बाधित रुग्णाचा हा शहरातील तिसरा मृत्यू आहे. तर हे तिन्ही मृत्यू घाटी रुग्णालयात झाले आहेत.

Web Title: CoronaVirus: Worrying! Corona's third death in Aurangabad; 65- year-old woman dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.