अत्याचार प्रकरणात नगरसेक सय्यद मतीन अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 11:22 PM2019-04-19T23:22:29+5:302019-04-19T23:23:11+5:30
औरंगाबाद : नगरसेवक सय्यद मतीन सय्यद रशीदला (३५, रा. टाऊन हॉल परिसर) महिलेवरील अत्याचार प्रकरणात पोलिसांनी शुक्रवारी (दि.१९) अटक ...
औरंगाबाद : नगरसेवक सय्यद मतीन सय्यद रशीदला (३५, रा. टाऊन हॉल परिसर) महिलेवरील अत्याचार प्रकरणात पोलिसांनी शुक्रवारी (दि.१९) अटक केली. महिलेला प्रथम नोकरीचे आमिष व त्यानंतर लग्नाचे आश्वासन देत तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी सय्यद मतीनविरुद्ध गुन्हा दाखल आहे़ शुक्रवारी सायंकाळी टाऊन हॉल परिसरातून सिटीचौक ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत नागरे यांनी अटक केली़ यापूर्वीदेखील दंगल प्रकरणात मतीनला सिटीचौक पोलिसांनी अटक केली होती़
एमआयएमचा वादग्रस्त नगरसेवक सय्यद मतीनची पक्षाने हकालपट्टी केली आहे़ एक ३० वर्षीय विवाहिता नवऱ्यापासून विभक्त होऊन दोन मुलांसह रशीदपुºयात राहते. वर्षभरापूर्वी ती महिला आधार कार्ड बनविण्यासाठी नगरसेवक मतीनच्या कार्यालयात गेली होती. तेथे मतीन आणि तिची भेट झाली. मतीनने तिला आधार कार्ड बनवून चांगली नोकरी मिळवून देतो, अशी थाप मारत तिच्याशी जवळीक निर्माण केली. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवीत रशीदपुरा आणि टाऊन हॉल येथे त्याने तिच्यावर अत्याचार केला; परंतु काही दिवसांनंतर त्याने लग्नास नकार देत बाहेर कोणला काही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. जानेवारी महिन्यात महिलेने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर सिटीचौक पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, मतीनने उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असता न्यायालयाने अर्ज फेटाळला होता.
सिटीचौक पोलिसांना शेख मतीन टाऊन हॉल परिसरात बसल्याची माहिती मिळाली होती़ ही माहिती मिळताच पोलिसांनी त्याला टाऊन हॉल परिसरातून अटक केली. पोलीस निरीक्षक दादाराव शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक हरीश खटावकर, उपनिरीक्षक प्रशांत नागरे, रावसाहेब चव्हण, माणिक चौधरी यांनी कारवाई पार पाडली.