मनपा सात ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:04 AM2021-09-26T04:04:01+5:302021-09-26T04:04:01+5:30

औरंगाबाद : पेट्रोल, डिझेलच्या किमती दिवसेंदिवस वाढतच आहेत. अनेक नागरिक आता ई-वाहनांना अधिक प्राधान्य देत असून, त्या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे ...

Corporation will set up charging stations at seven places | मनपा सात ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारणार

मनपा सात ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारणार

googlenewsNext

औरंगाबाद : पेट्रोल, डिझेलच्या किमती दिवसेंदिवस वाढतच आहेत. अनेक नागरिक आता ई-वाहनांना अधिक प्राधान्य देत असून, त्या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे शहरात ७ ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिली. मध्यवर्ती जकात नाका येथील मनपाच्या पेट्रोल पंपावर चार्जिंगची यंत्रणाही उभारण्यात आली असून लवकरच तेथे या सेवेचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

शहरात पाच ठिकाणी मनपा पेट्रोलपंप उभारणार आहे. हर्सूल जकात नाका परिसर, चिकलठाणा येथे मनपा कचरा प्रक्रिया केंद्राच्या बाजूला, जळगाव रोडवर, नक्षत्रवाडी येथे मनपाच्या जागेवर पंप राहतील. या पंपावर पेट्रोल-डिझेलची विक्री करण्यात येणार आहे. सध्या मध्यवर्ती जकात नाका येथे सुरू केलेला प्रगती पेट्रोलपंप चांगला सुरू असून, नागरिकांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. शहरात आणखी चार ठिकाणी पंप सुरू करण्याची प्रक्रिया जोरात सुरू आहे.

या सेवेसोबतच मनपा प्रत्येक पंपावर चार्जिंग स्टेशनही उभारणार आहे. याशिवाय मनपा मुख्यालय, स्मार्ट सिटी कार्यालयातही ही सुविधा राहणार असल्याचे पाण्डेय यांनी सांगितले. महापालिकेच्या जकात नाका येथील पंपावर २४ के. व्ही. आणि ७ के. व्ही.ची दोन यंत्रे स्वतंत्रपणे चार्जिंगसाठी आणण्यात आली आहेत. लवकरच ही सेवा सुरू होईल. १५ व्या वित्त आयोगातून मिळालेल्या निधीतून मनपा प्रशासन स्वत: काही ई-वाहने खरेदी करणार आहे. ही वाहने भविष्यात महापालिकेचे पदाधिकारी वापरतील.

याठिकाणी असतील चार्जिंग स्टेशन

- मध्यवर्ती जकात नाका पेट्रोलपंप

- मनपा मुख्यालय

- स्मार्ट सिटी कार्यालय

- हर्सूल जकात नाका

- चिकलठाणा कचरा प्रकल्पाजवळ

- नक्षत्रवाडी पंप हाऊसजवळ

- जळगाव रोडवरील आंबेडकरनगर

Web Title: Corporation will set up charging stations at seven places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.