एमजीएम परिसरात मनपाचे १०० खाटांचे बाल कोविड रुग्णालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:04 AM2021-05-08T04:04:06+5:302021-05-08T04:04:06+5:30
औरंगाबाद : कोरोनाची तिसरी लाट लवकरच येणार आहे. या लाटेचा मुकाबला करण्यासाठी महापालिका प्रशासनाने दोन मोठी पावले उचलली आहेत. ...
औरंगाबाद : कोरोनाची तिसरी लाट लवकरच येणार आहे. या लाटेचा मुकाबला करण्यासाठी महापालिका प्रशासनाने दोन मोठी पावले उचलली आहेत. एमजीएम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे लहान मुलांसाठी १०० खाटांचे स्वतंत्र कोविड रुग्णालय, सिडको एन-८ रुग्णालयात गरोदर महिलांसाठी ५० खाटांचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे.
शुक्रवारी महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी महापालिका व शहरातील बालरोग तज्ज्ञांची त्यांच्या दालनात बैठक घेतली होती. यावेळी आयुक्तांनी बालकांसंदर्भातील कोरोना संसर्गाचे वेळीच नियोजन करून सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. मनपाच्या वतीने एमजीएम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे १०० खाटांचे बालकांसाठी कोविड रुग्णालय सुरू करण्यात यावे. तसेच मनपाच्या सिडको एन -८ रुग्णालयात कोविड गरोदर मातांना औषधोपचाराच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. बैठकीत खाजगी डॉक्टरांनी सांगितले की आठ ते दहा टक्के बालकांमध्ये सर्दी, खोकला अशी सौम्य लक्षणे आहेत. पण त्याबद्दल घाबरण्याचे कारण नाही. हार्ट डिसीज तसेच इतर आजार झाल्यास क्रिटिकल असेल असे ते म्हणाले.
बैठकीला मनपाच्या वैद्यकीय अधिकारी नीता पाडळकर, बाल रोग तज्ज्ञ डॉ. नवागिरकर ,डॉ. राठोडकर,डॉ. उज्वला भामरे, डॉ. मेघा जोगदंड, डॉ. मनोज बजाज, डॉ.सावरे, डॉ. लीना सोनी, डॉ. शैलेजा ताठे, डॉ. शोएब, डॉ. स्मिता नळगिरकर, डॉ.श्याम खंडेलवाल, डॉ. संध्या कोंडपल्ले, डॉ. प्रभा खैरे, डॉ. प्रशांत जाधव ,डॉ. गणेश कुलकर्णी ,डॉ.रेणू बोराळकर, डॉ. अमित पिलखाने, डॉ. निखिल पाठक ,डॉ.अभिजीत जोशी, डॉ. सागर कुलकर्णी,डॉ. प्रशांत चव्हाण, डॉ.सचिन खबयते व डॉ. हशीब आदी डॉक्टर उपस्थित होते.