उस्मानपुरा, गारखेड्यात मनपाची सीबीएससी शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:04 AM2021-07-27T04:04:41+5:302021-07-27T04:04:41+5:30
या दोन्ही शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. ज्या विद्यार्थ्यांना सीबीएसईमधून शिक्षण घेण्याची इच्छा असेल त्यांना एलकेजी, ...
या दोन्ही शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. ज्या विद्यार्थ्यांना सीबीएसईमधून शिक्षण घेण्याची इच्छा असेल त्यांना एलकेजी, यूकेजी, फर्स्ट आणि सेकंड या चार वर्गांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जात आहे. पालिकेच्या विविध शाळांमधून निवड केलेले २५ ते ३० शिक्षक या ठिकाणी शिक्षण देणार आहेत. या सर्व शिक्षकांना वेळोवेळी प्रशिक्षण दिले जाणार आहे. सर्व शिक्षक सीबीएसई अभ्यासक्रम शिकवत आहेत. या दोन्ही शाळांत मोफत प्रवेशप्रक्रिया सुरू केली आहे. शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी, सर्व स्तरातील मुला-मुलींना प्रवेश मिळावा, प्रत्येक पालकाला ही शाळा आपली वाटावी, या हेतूने प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने, उपायुक्त डॉ. संतोष टेंगळे, शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे, सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार, केंद्रीय मुख्याध्यापक अहमद पटेल व शशिकांत उबाळे परिश्रम घेत आहेत.