महामंडळाची ‘मिनी’ सिटी बससेवा सुरू
By Admin | Published: February 16, 2016 11:48 PM2016-02-16T23:48:55+5:302016-02-17T00:45:01+5:30
औरंगाबाद : एसटी महामंडळातर्फे मंगळवारपासून दोन मार्गांवर मिनी बसेसद्वारे शहर बससेवा सुरू करण्यात आली.
औरंगाबाद : एसटी महामंडळातर्फे मंगळवारपासून दोन मार्गांवर मिनी बसेसद्वारे शहर बससेवा सुरू करण्यात आली. गेल्या काही वर्षांपासून अरुंद रस्ते, वाहतूक कोंडीमुळे मिनी बसेसद्वारे शहर बससेवा चालविण्याची मागणी होत होती. अखेर मंगळवारपासून त्यास प्रत्यक्षात प्रारंभ झाल्याने मिनी बसेसचे प्रवाशांकडून स्वागत करण्यात आले.
शहर बसेसची संख्या वाढविण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या एसटी महामंडळाने डिसेंबर २०१५ मध्ये शहरामध्ये मिनी बसेसद्वारे बससेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या. त्यानुसार यशवंती नावाने ओळखल्या जाणाऱ्या मिनी बसेस औरंगाबादला देण्याचा निर्णय एसटी महामंडळाच्या वरिष्ठ कार्यालयाने घेतला. हा निर्णय होत नाही तोच जानेवारीत नांदेड येथील ५ मिनी बसेस शहरात दाखल झाल्या; परंतु नादुरुस्तीच्या कारणामुळे त्या परत पाठविण्यात आल्या. (पान २ वर)